मनोरंजन महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध करुन देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सन २०२० आणि सन २०२१ मधील विविध सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

Summary

मुंबई, दि. 10 : आपल्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार करत असतात. आगामी काळात महाराष्ट्र आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर कसा राहील यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत नाट्यगृहे मराठी नाटकांसाठी अल्प दरात […]

मुंबई, दि. 10 : आपल्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार करत असतात. आगामी काळात महाराष्ट्र आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर कसा राहील यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत नाट्यगृहे मराठी नाटकांसाठी अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कलांगण येथे प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपिस्थत होते. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंतांना आज सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यभरात सध्या ८३ नाट्यगृहे असून २२ नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येतात. उर्वरित ५२ नाट्यगृहांचे नूतनीकरण यासह राज्य शासनाच्या रवींद्र नाट्य मंदिराचे नूतनीकरण याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

लवकरच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. या पोर्टलवर कलाकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.

सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभावेळी ‘उत्सव महासंस्कृती’चा हा नृत्य, नाट्य, भक्ती, संगीत आणि रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कृष्णा मुसळे, कार्तिकी गायकवाड, संपदा माने, संदेश उमप, संपदा दाते, संतोष साळुंखे, संघपाल तायडे, शिल्पी सैनी या कलाकरांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते.

प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :

नाटक या क्षेत्रासाठी सन 2020 करिता कुमार सोहोनी आणि सन 2021 करिता गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंठ संगीत या क्षेत्रासाठी सन 2020 करिता पंडितकुमार सुरुशे आणि सन 2021 करिता कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शौनक अभिषेकी आणि सन 2021 करिता देवकी पंडित यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटासाठी सन 2020 करिता मधु कांबीकर आणि सन 2021 करिता वसंत इंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. किर्तन या क्षेत्रासाठी सन 2020 करिता ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2021 करिता गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहिरी या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शाहीर अवधूत विभूते आणि सन 2021 करिता कैलासवासी शाहीर कै. कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नृत्य या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शुभदा वराडकर आणि सन 2021 करिता जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलादान या क्षेत्रासाठी सन 2020 करिता अन्वर कुरेशी आणि सन 2021 करिता देवेंद्र दोडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2020 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 करिता ओमकार गुलवडी यांना प्रदान करण्यात आला. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शिवाजी थोरात आणि सन 2021 करिता सुरेश काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोककला या क्षेत्रासाठी सन 2020 करिता सरला नांदुलेकर आणि सन 2021 करिता कमलबाई शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी गिरीजनया क्षेत्रासाठी सन 2020 करिता मोहन मेश्राम आणि सन 2021 करिता गणपत मसगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *