महाराष्ट्र हेडलाइन

मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, EWS म्हणजे काय?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १ जुन २०२१:- राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १ जुन २०२१:-
राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे.
मंत्रीमंडळाच्या याआधीच्या डिसेंबर महिन्यातील निर्णयानुसार अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. संसदेने संविधानात १०३ व्या घटनादुरूस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
*EWS आरक्षण म्हणजे काय ?* EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी घेतला होता, ज्यावरून तेव्हाही बरीच चर्चा झाली होती. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. EWS आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असे हा कायदा सांगतो. तसेच अशा व्यक्तींचे घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *