मनोज जरांगे बोलले, आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली. मनोज जरांगे पाटलाच्या या वक्तव्या वर महाराष्ट्र भरातून जनतेच्या प्रतिक्रिया👇
प्रतिनिधी मुंबई
मनोज जरांगे बोलले, आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली.
मनोज जरांगे पाटलाच्या या वक्तव्या वर महाराष्ट्र भरातून जनतेच्या प्रतिक्रिया👇
कोणत्या जातीची लोक आहेत ज्यांची लायकी नाही (धनगर, माळी, महार, चांभार, तेली,मांग, वडार, ढोर, वंजारी, बंजारा की अजून कुणी), कोणाची लायकी नाही ते स्पष्ट करावं. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहेच, OBC मधून घ्या नाही तर वेगळं घ्या! कुणाला काही अडचण नाही, *पण कुठल्या लोकांची आणि जातीची लायकी काढाल तर अश्या सडक्या मानसिकतेला जाहीर पणे विरोध आहे.*
आरक्षण मिळण्यापूर्वीच हे महाशय खूप काही बोलत आहेत अहो तुम्ही आरक्षण मागत असताना या विशाल देशाचे संविधान लिहीणार्या Dr,बाबासाहेबांचा फोटो वापरण्याचे जाणीव पूर्वक टाळता कोणत्याही सभेमध्ये त्यांचे नाव घेण्याचे टाळता यातच आपली हुशारी कळते
Manoj जरंगे सारख्यांची लायकी नाही इतर समाजाची समर्थन घेण्याची
त्यांनी अशी कंमेंट करून मराठा वगळता सर्वांची सहानुभूती गमावून बसले आहेत. दादागिरी करून आरक्षण मिळत नाही. त्याला संविधान ची मान्यता असावी लागते.
लायकी कोणाची काढताय?
शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक अठरा पगड जातीतील बहुजन मावळ्यांकडे लायकी होती म्हणूनच शिवरायांसाठी लढले.
महात्मा फुलेंची वैचारिक लायकी होती म्हणूनच शिवरायांची समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक लायकी होती म्हणूनच या देशाचं संविधान निर्माण झालं.
कोणाची लायकी काढताय?
पेशवाईला लोळवणारे शूरवीर महार सैनिक लायकी होती म्हणूनच लढले.
वारकरी परंपरेतील बहुजन संत लायकी होती म्हणून संत झाले.
हजारो वर्षांपासून हक्क अधिकार शिक्षण जमिनी संपत्ती या पासून दूर ठेवलेल्या समाजाची लायकी तेंव्हाच कळेल जेंव्हा त्या समाजाला शिक्षण, हक्क अधिकार, जमिनी, संपत्ती सर्वच गोष्टीची पूर्तता होईल. मग बघा कोणाची किती लायकी आहे ते.
आम्हाला आमच्या बापाने (डॉ बाबासाहेब आंबेडकर) असे शिकवले आहे की शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.तूमच्याहीप्रमाणे आम्हाला ही खालची पातळी गाठता येते परंतु आम्हाला ते संस्कार नाहीत.ज्या संविधानाच्या आधारावर आपण आरक्षण मागता त्या संविधान निर्मात्याचे आपण नांव देखील घेत नाही म्हणजे तूम्ही कोणाचे काम करीत आहात ते बहुजनांच्या लक्षात येत आहे.
मनोज जरांगे स्वतः ची आरक्षण घेण्याची तरी लायकी आहे का???
वर्णव्यवस्थे मध्ये जगणाऱ्याने इतरांची लायकी काढू नये त्यांनी त्यांच्या स्वतःची जागा पहावी.
असे स्टेटमेंट करतानाच बुद्धिमत्ता कळते
यांना संविधान निर्मिती कोणी केली याचे घेणेदेणे नाही यांना फक्त संविधानातून आरक्षण पाहिजे, वारे मानसिकता
अरे तो अनपड गवार माणूस आहे ज्याला गावातून हाकलून दिले आहे तो सासरवाडीत तुकडे मोडतो हे जग जाहीर झाले त्याचं तेवढं बहुजन समाजाने मनावर घेऊ नये 🤣
S.t.s.c.o.b.c.यांना.न.काही.करता.आरक्षण.दिले. आमच्या.बापानी.आमच्या.बापाकडे.32.डिग्री.आणि.9.भाषा.चां.अभ्यास.होता.
शंभर शंभर JCB मधून फुल उधळावतात एवढा पैसे येते कुठून
शिकला कीती हा बोलतो कीती
तूझी काय लायकी आहे हे आम्हाला माहिती आहे. आरक्षण कोठून मिळतय त्याला तरी माहीत आहे काय . आडव बोलून आरक्षण द्या म्हणतोय. थेट आडाणी.