मनपाद्वारे भानापेठ, गंजवार्डातील तीन दुकानदारांना दंड
Summary
चन्द्रपुर:- ता. 28 शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दित कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करुण कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर […]
चन्द्रपुर:- ता. 28 शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दित कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करुण कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाही करण्यात येत आहे. बुधवारी (ता.28) मनपाने चन्द्रपुर शहरातील झोन क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या भनापेठ , गंजवार्डातिल तीन दुकानदारांनविरुद्ध कारवाही करीत 12 हजाराचा दंड वसुल करण्यात आला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्रमांक 1 च्या सहायक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात झोन अधिकारी, अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाही केली. भनापेठ, गंजवार्डातिल गुप्ता किराना, रंजीत ड्रेसेस, दुलाल शाह आदि प्रतिष्ठाने नियमांचे उलंघन करुण सुरु होती. या तीन प्रतिष्ठानांवर कारवाही करुण 12 हजार रूपयाचा दंड वसूल केला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपा कडून देण्यात आली.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर