मजूर घेऊन जाणारे वाहन पलटी; अनेक महिला जखमी पांजरा- कान्हाळगाव मार्गावरील भीषण अपघात

मोहाडी (ता.प्र.) – पांजरा येथून कान्हाळगावकडे मजूर महिला घेऊन जात असलेले वाहन (दु. ६ जुलै रोजी) सकाळी १०:३० वाजता रस्त्याच्या कडेला उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक महिला मजूर गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मजूर महिला एका शेतीकामासाठी जात होत्या. अपघातग्रस्त वाहन अत्यंत भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळून उलटले. या दुर्घटनेत काही महिला गाडीखाली अडकल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले. यामध्ये काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.
—
🛡️ पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
📍 जिल्हा: भंडारा | तालुका: मोहाडी
—