महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉट्सॲप चॅनेलवर; व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

Summary

मुंबई, दि. 20 :  वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. […]

मुंबई, दि. 20 :  वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्त्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून  सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

चॅनेलला असे करा फॉलो :

व्हॉटसॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va9ERCr4NViuAvsdCI14 या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *