मंगळवेढा शहराच्या विकास कामासाठी अजित पवारांचे निधी मंजूरीसाठी आदेश : अजित जगताप
Summary
मंगळवेढा नगरपरिषदकडून बांधल्या जाणाऱ्या मल्टीर्पपज हॉलसाठी उर्वरित 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे करिता व अत्याधुनिक स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्रासाठी अजित जगतापांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित […]
मंगळवेढा नगरपरिषदकडून बांधल्या जाणाऱ्या मल्टीर्पपज हॉलसाठी उर्वरित 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे करिता व अत्याधुनिक स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्रासाठी अजित जगतापांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, राष्ट्रवादी सहकार सेलचे राजेंद्र हजारे, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे आदीजन उपस्थित होते.
मंगळवेढा नगरपरिषदेकडून जुना मल्टीर्पपज हाॅल पाडण्यात आला आहे.सदर हाॅलच्या जागी नविन अद्यावत असा हाॅल बांधकाम करण्याचा प्लॅन तयार झाला असून त्याचे अंदाजपत्रक सुमारे 8 कोटी रूपये झाले आहे.
यापूर्वीचे सरकारने सदर कामाकरिता वैशिष्टय़पूर्ण योजनेतून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला असून उर्वरित 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणेकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निधी मंजूर करणेबाबत तात्काळ संबंधित विभागाला आदेश दिले.
तसेच मंगळवेढा शहरात अत्याधुनिक स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्र बांधण्याकरिता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देणेबाबत पालकमंत्री दत्ता भरणे तात्काळ सांगितले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750