BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

मंगळवेढा ब्रेकिंग! अखेर दामाजी साखर कारखान्याची वार्षिक सभा स्थगित

Summary

राज्याचे मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव व त्यासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत दुरचित्रवाहिनीवरुन केलेले आवाहन व सध्याचा कोवीड-१९ चा वाढता प्रभाव यामुळे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची दि.२७ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभा कोवीड-१९ […]

राज्याचे मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव व त्यासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत दुरचित्रवाहिनीवरुन केलेले आवाहन व सध्याचा कोवीड-१९ चा वाढता प्रभाव यामुळे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची दि.२७ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभा कोवीड-१९ चे वाढत्या प्रभावामुळे तात्पुरती स्थगित करण्यात येत असलेचे संस्थेचे चेअरमन समाधान आवताडे यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी दि.२१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव व त्यासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत दुरचित्रवाहिनीवरुन आवाहन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोठेही कारखान्याची एवढी मोठी प्रमाणावर सभासद असणारी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या काळात झाली नाही.त्यामुळे या सर्व कारणाचा विचार करता श्री संत दामाजी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी असे निवेदन सर्व पक्षिय पदाधिका-यांच्या सह्याचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नावे दिले होते.

यामध्ये त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राजकिय, सामाजीक, धार्मीक कार्यक्रम,मिरवणुका, आंदोलन,सभा मोर्चे, यात्रांवर बंदी घालण्यात आली असलेचे नमुद करुन नियम न पाळणायांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

यामध्ये त्यांनी मास्क घाला, सुरक्षीत अंतर ठेवा, सùनीटायझरने हात वारंवार धुवा व कोरोनाची साखळी तोडणेस मदत करा असे आवाहन केले आहे. याशिवाय गरजेप्रमाणे बंधने घालण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेचे प्रकट केले आहे.

आपल्या कारखान्याचे २८००० पेक्षा जास्त सभासद आहेत। सभेसाठी मोठया प्रमाणात गर्दी होवुन केवळ एकाद्या व्यक्तीमुळे कोरोनाचा प्रभाव मोठया प्रमाणात वाढणेची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्र्यांचे अवाहनास प्रतिसाद व कोरोनाचे वाढते संकट विचारात घेता श्री संत दामाजी सह।साखर कारखान्याची दि.२७ फेब्रुवारी रोजी होणारी ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात येत असुन सभेची पुढील तारीख,वेळ व ठिकाण यथावकाश जाहिर करण्यात येईल असे समाधान आवताडे यांनी बोलताना सांगीतले

सचिन सावंत
मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *