महाराष्ट्र हेडलाइन

मंगळवेढयात विज चोरीविरूध्द कडक मोहिम ‘एवढे’ जणांना पकडले, 3 लाख 60 हजाराचा केला दंड

Summary

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात विज वितरण कंपनीने वीज चोरी विरूध्द मोहिम राबवून विज चोरी करणार्‍या 32 जणांना पकडले आहे.दरम्यान,या विज चोरांना विज वितरण कंपनीने 3 लाख 60 हजार रुपये दंड ठोठावला असून संबंधितांना रकमा भरण्याच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. […]

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात विज वितरण कंपनीने वीज चोरी विरूध्द मोहिम राबवून विज चोरी करणार्‍या 32 जणांना पकडले आहे.दरम्यान,या विज चोरांना विज वितरण कंपनीने 3 लाख 60 हजार रुपये दंड ठोठावला असून संबंधितांना रकमा भरण्याच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात मोठया प्रमाणात विज चोरी होत असल्याचे विज वितरणच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर मागील चार दिवसापुर्वी विज चोरीविरूध्द संपूर्ण तालुक्यात मोहिम राबविली.

यामध्ये ब्रम्हपुरी, बठाण, घरनिकी, देगाव, मल्लेवाडी, मंगळवेढा शहर, बोराळे, शरदनगर, डोणज, जालिहाळ, नंदेश्वर, अरळी, तळसंगी, तामदर्डी, बालाजीनगर येथे अनधिकृत विज घेणारे आकडे व केबल जप्त करून 32 लोकांवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई मंगळवेढा विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा ग्रामीणचे अभियंता भगवान आलदर,मंगळवेढा शहरचे सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर,लाईनमन सलगर,खरबडे व अन्य कर्मचार्‍यांच्या मदतीने ही कारवाई मोहिम राबविण्यात आली.

यापुढेही विज चोरीची मोहिम अशीच चालू राहणार असल्याने नागरिकांनी व शेतकर्‍यांनी विज वितरणकडे अधिकृत कनेक्शन घेवून विजेचा वापर करावा अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा विज वितरण कंपनीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान विज गळती ही मोठया प्रमाणात होत असल्याने विज वितरणच्या अधिकार्‍यांनी यावर उपाययोजना करून विज गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत व अन्य ठिकाणी भर दिवसा तारेवर आकडे टाकून विज चोरली जात आहे. येथून विज वितरणचे अधिकारीही ये जा करतात मात्र या आकडयांकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याने विज चोरीच्या प्रमाणात वाढ होवून याचा फटका विज वितरण कंपनीला बसत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.

विज चोरीला आकडे टाकणार्‍यावर सदर विभागाचा लाईनमनही जबाबदार असल्याचा बोलबाला सुरु असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोषी लाईनमनवरही कारवाई करून होणारी विज चोरी थांबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे

सचिन सावंत
मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *