भेसळ आढळल्यास करा टोल फ्री क्रमांकावर तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
भंडारा:- अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासन सजग असून भेसळी बाबत काही तक्रार असल्यास नागरिकांना व ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. याखेरीज अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांची वेबसाईट फॉस्फोट किंवा एफएसएसआईवर देखील हायपर लिंक द्वारे अन्नामध्ये भेसळ अथवा गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा या सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी सदर पोर्टलवर या ॲपवर ग्राहकांनी लॉगिन करावे व त्यानंतर आपली सरकार व तक्रारीच्या अनुषंगाने फोटो असल्यास सदर तक्रार व संबंधिताचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे तसेच तक्रारीची दखल ही त्वरित घेतल्या जाईल व संबंधित कार्यालयामार्फत तक्रारीवर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. तरी सर्व ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा. तसेच अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार असल्यास नोंदवावी. असे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी कळविले आहे तसेच नगरपरिषद भंडारा येथे ०७ जुलै २०२३ रोजी सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत आवश्यक असलेल्या परवाना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरामध्ये हातगाडी विक्रेता व फळे विक्रेता यांना इतरांना व्यवसायिकांना देखील याची परवाना नोंदणी करिता अर्ज सादर करता येईल व या नोंदणी करिता आधार कार्ड छायाचित्र प्रत तसेच पासपोर्ट फोटोची आवश्यकता आहे. तरी सर्व परवाना नोंदणी कागदपत्राबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.