भिर्रर्ररररर ……. मावळात ८वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उडाला धुराळा.

पत्रकार – सागर घोडके
पुणे ( मावळ)
भिर्रर्ररररर ……. मावळात ८वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उडाला धुराळा.
पुणे (मावळ) – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांनी पहिली बारी घेवून गाडा प्रेमी व गाडा मालक यांना ८ वर्षे प्रतिक्षेत असलेल्यांना दिलासा दिला. जिल्हा आधिकारी राजेश देशमुख यांची रितसर परवानगी घेऊन सलग दोन दिवस चालू असलेल्या शर्यतीमध्ये असंख्य गाडा मालकांनी सहभाग घेतला होता. गाडा नानोली तर्फे चाकण येथे भरवण्यात आले होते.
या वेळी बैलगाडी शर्यतीत रामनाथ वारिंगे यांच्या बैलगाड्याने 11.34 घाट पार करत फायनल सम्राट होण्याचा मान मिळाला. या वेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार श्रीरंग बारणे , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून बैलगाडा आवश्यक असलेली बैलांच्या तंदुरुस्त संदर्भाताले सर्टिफिकेट दाखला घाटात उपलब्ध करून दिले.
८ वर्षानंतर पहिल्यांदा शर्यत भरल्याने एक लाखांपेक्षा अधिक गाडा प्रेमींनी गर्दी केली होती या वेळी एक विलक्षण क्षण पाहण्यासाठी मिळाला एक ७५ वर्षीय वृध्द गाड्या पुढे घोडी पळवताना पाहण्यास आला. यामुळे नानोली तर्फे चाकण येथे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली. शर्यत मध्ये भाग घेण्यासाठी नाशिक, अौरंगाबाद, कराड, सांगली, सातारा, रायगड ,पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांनी आपला सहभाग दाखवलाय.
स्पर्धातील बक्षीस हे सर्वांचे लक्ष वेधून घेते होते.
प्रथम येणाऱ्या प्रत्येक बारीक एक दुचाकी, दुसऱ्या क्रमांकास १ लाख ५१ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकास १ लाख रुपये तर चौथ्या क्रमांकास ७५ हजार रुपये तसेच प्रत्येक क्रमांकास अर्धा तोळा सोन्याची अंगठी, फायनल मध्ये जाणाऱ्या गाडयास ५१,३१,२१,हजार रुपये अनुक्रमे व घाटाचा राजा मान मिळवलेल्या गाड्यास एक तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षीस ठेवले होती.
घाटाचा राजा हा मान -पांडुरंग किसन काळे (श्रीगोंदा)
काळुराम भिकाजी मिंडे-मांडेकर याची जुगलबंदी .
फायनल सम्राट- रामनाथ वारिंगे , कै. सहाद मामा काळोखे, भेगडे राक्षे , संतोष मांडेकर, काळुराम मांडेकर, आशिषसेठ येलवडे , हे मानकरी ठरले