भिमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा
Summary
भिमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा बल्लारपूर (पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क- तालूक प्रतिनिधी) भिमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती येथील जयभिम चौक येथे निर्माणाधिन असून विजयस्तंभाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.१जानेवारी,२०२२ रोजी विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळ,महार रेजिमेंट चे येवला निवासी जि.नाशिक, रिटायर्ड कचरु […]
भिमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा
बल्लारपूर (पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क- तालूक प्रतिनिधी)
भिमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती येथील जयभिम चौक येथे निर्माणाधिन असून विजयस्तंभाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.१जानेवारी,२०२२ रोजी विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळ,महार रेजिमेंट चे येवला निवासी जि.नाशिक, रिटायर्ड कचरु वेडू् साळवे,विरचक्र सन्मानित१९७१(भारत-पाक युध्द)यांचे हस्ते सकाळी १०.०० वाजता संपन्न होत आहे.
सकाळी ८.०० वाजता डॉ. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज,नगर परिषद जवळील पुर्णाकृती पुतळ्यास मानवंदना व भदन्त ज्ञानज्योती महास्थविर व त्यांचा भिक्खू संघासह जयभिम चौक पर्यंत भीमसैनिक पदयात्रा तसेच का भदंत ज्ञानज्योती द्वारा ध्वजारोहण सकाळी १०.००, सकाळी ११.०० भिक्षू संघाला भोजनदान, दुपारी १२.०० वाजता अॅड.पवन देवराव मेश्राम तर्फे प्रास्ताविक.महास्थविर भदंत ज्ञानज्योती यांचे मार्गदर्शन पर भाषण.दुपारी १.००, व्याख्यानमाला मा्.डाॅ.अभिलाषा गावतुरे,(विषय: ” स्वातंत्र्य पुर्व काळातील व आजच्या स्त्रीयांची परिस्थिती आणि त्यांच्या पुढील आव्हाने व उपाय” )
डॉ.जावेद पाशा, सर (विषय:आजचा युवक आणी त्यांच्या पुढील भविष्यातील आव्हाने व उपाय),प्रा.दिलीप चौधरी (विषय:भिमा क़ोरगाव शौर्याची यशोगाथा व आजची प्रासंगिकता),श्याम – ए- कव्वाली, सायंकाळी ५.००. वाजता. कव्वाल- झाकिर हुसेन ताजी,कुही-नागपुर.आभार,देशपाल मुन. नागपूर.आभार-देशपाल मुन.करतील. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेबीबीएस चें कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.संतोष बेताल,अध्यक्ष , जेबीबीएस, विदर्भ यांनी प्रकाशित पत्रका द्वारे कळविले आहे.