भिडेंच्या वक्तव्याचा माळी समजाकडून निषेध संत सावता माळी संस्था,काटोल तर्फे निषेध सभा
प्रतिनिधी/३ ऑगस्ट
काटोल – संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी अतिशय घृणास्पद वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ निषेध सभा संत सावता माळी संस्था,काटोल तर्फे महात्मा फुले भवन, काटोल येथे घेण्यात आली.
यावेळी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महात्मा गांधीजी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून माळी समाजाकडून करण्यात आली.
महात्मा गांधींच्या बद्दल संभाजी भिडे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कांबळे, सचिव तुलसीदास फुटाणे, पं.स.सभापती संजय डांगोरे, रमेश तिजारे,मोहन डांगोरे, किरण डांगोरे, हितेंद्र गोमासे, ताराचंद कांडलकर,योगीराज बारमासे,प्रभाकर देवते,प्रकाश गांजरे,विवेक उमप, संदीप टेंभे प्रामुख्याने उपस्थित होते.