चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाचे आयोजन..

Summary

चंद्रपूर दि.10 ऑक्टोबर:- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयाच्यावतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण दिनापासून वर्षातील पुढील 52 आठवडे दर सोमवारला जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात येत […]

चंद्रपूर दि.10 ऑक्टोबर:- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयाच्यावतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण दिनापासून वर्षातील पुढील 52 आठवडे दर सोमवारला जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील यशसिद्ध मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रातील यश संपादनाबाबतचा जीवन प्रवास, आश्रमशाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे उलगडावा, त्यातून विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती पासून ध्येयप्राप्ती पर्यंतची प्रेरणा मिळावी. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यातून पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे महत्त्व समजण्यास तसेच विविध व्यवसायाची ओळख होण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण तसेच व्यवसायाबाबतची जागरूकता वाढीस लागून चालना मिळेल. सदर उपक्रम एटीसी नागपुर, नवचेतना या यूट्यूब चैनलवर उपलब्ध असणार आहे.

या उपक्रमामध्ये नागपूर,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या सहाय्यक संचालक परिनीता पंधराम, नागपूर जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मनोहर मेश्राम, एल. पी.कोडापे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा
न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *