BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून इतिहास रचला – क्रीडामंत्री सुनील केदार

Summary

मुंबई, दि. 5 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला पराभूत केले.  सांघिक प्रयत्न आणि  कठोर परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय […]

मुंबई, दि. 5 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला पराभूत केले.  सांघिक प्रयत्न आणि  कठोर परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. हा विजय भारतीयांच्या गौरवाचा आहे, अशा शब्दात क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केलं आहे.

क्रीडामंत्री श्री.केदार सामन्याबाबत म्हणाले, सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामना बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.  भारताने सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी कांस्यपदकावर नाव कोरलं आहे.

मी सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यवस्थापक यांचे अभिनंदन करतो. भावी  यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात क्रीडामंत्री सुनील केदार यांनी हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *