BREAKING NEWS:
देश नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख

Summary

नवी दिल्ली 01 : एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.  व्हाइस अॅडमिरल श्री. देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून अभियांत्रिकी  पदवी प्राप्त केली. अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात त्यांनी 31 मार्च 1986 रोजी […]

नवी दिल्ली 01 : एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

 व्हाइस अॅडमिरल श्री. देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून अभियांत्रिकी  पदवी प्राप्त केली. अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात त्यांनी 31 मार्च 1986 रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी मिळवली असून वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाची पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.

व्हाइस ॲडमिरल श्री. देशमुख यांनी नौदल मुख्यालय, चाचणी संस्था, सामग्री संयोजन, एचक्यूईएनसी येथील नौदल गोदी आणि कमांड स्टाफ अशा विविध कार्यालयांमध्ये कर्मचारी, कार्मिक तसेच सामग्री विभागात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यासोबतच त्यांनी राजपूत, दिल्ली तसेच तेग श्रेणीतील आघाडीच्या जहाजांवर देखील काम केले आहे.

नौदलातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक तसेच अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *