महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

मुंबई, दि. १३ : स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत राज्यातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा […]

मुंबई, दि. १३ : स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत राज्यातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन ठेवूनच राज्य सरकार काम करत आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, तसा संकल्प या जयंतीदिनी आपण करू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *