भाजपला धक्का:गुजराती बांधवांचा शिवसेनेत प्रवेश.महापालिका निवडणुकीत उमेदवारीही देणार
Summary
मुंबई : शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असा नारा दिला आहे. या निमित्ताने शिवसेनेने 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शिवसेनेकडून (Shivsena)जोगेश्वरीतील गुजराती समाज भवनात गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात […]
मुंबई : शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असा नारा दिला आहे. या निमित्ताने शिवसेनेने 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शिवसेनेकडून (Shivsena)जोगेश्वरीतील गुजराती समाज भवनात गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी असंख्य गुजराती बांधव (Gujarati brothers )शिवबंधनात अडकले असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नव्याने पक्षप्रवेश केलेल्या गुजराती बांधवाची भेट होणार असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांचे स्वागत करतील.
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आज प्रवेश केलेल्या बांधवांपैकी जवळपास ३० जणांना आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.
✍️प्रशांत मानसिंग जाधव
नवी मुंबई न्युज रिपोटर
9819501991