भंडारा सामान्य रुग्णालयात नियुक्त महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) च्या सुरक्षा रक्षकांची शानदार कामगिरी।
आज सकाळी २ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील नवजात शिशू वार्डात शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे धुव्वा बघुन लक्षात येताच, तेथे नियुक्त मेस्क़ो महिला सुरक्षा रक्षकांनी वार्डातील परीचरिकांना लगेच सुचीत करून लहान ७ शिशूंना बाहेर काढून वाचविले तसेच बाहेरच्या मेस्को रक्षकांनी खिडकीतून पाणी मारुन आग विझवून होणारी संभावित भयंकर हानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले व धुव्वा व आग असलेल्या वार्डातील बालक व महिलांना वार्डाचे आत प्रवेश करून वाचविले. त्याबद्दल मेस्को सुरक्षा रक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.