BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा शांतता कमिटी/जातीय सलोखा समिती सदस्य मीटिंग

Summary

प्रतिनिधी भंडारा      दिनांक २६-०६-२०२३ रोजी भंडारा पोलीस मुख्यालय मीटिंग हॉलमध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त जिल्ह्याची शांतता समिती बैठक घेण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी भंडारा श्री योगेश कुंभेजकर, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री लोहित मतांनी, अप्पर पोलीस […]

प्रतिनिधी भंडारा
     दिनांक २६-०६-२०२३ रोजी भंडारा पोलीस मुख्यालय मीटिंग हॉलमध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त जिल्ह्याची शांतता समिती बैठक घेण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी भंडारा श्री योगेश कुंभेजकर, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री लोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक साकोली श्री सुशांत सिंग, सहायक पोलीस अधीक्षक तुमसर श्रीमती रश्मिता राव, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा श्री डॉक्टर अशोक बागुल, उपविभागीय पोलीस अधिकारी पुणे श्री मनोज श्रीराम, मुख्य अधिकारी नगरपरिषद भंडारा श्री विनोद जाधव, डिस्टिक हेल्थ ऑफिसर डॉक्टर नंदागवळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर श्री अशोक बागुल, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा यांनी शांतता समिती व जातीय सलोखा समिती अबाधित राहण्याकरिता प्रास्ताविक देऊन वरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जातीय सलोखा व शांतता समिती सदस्य श्री गफ्फार भाई लाखनी यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. सण उत्सव येतात हे शांततापूर्वक झाले पाहिजे याकरिता जातीय सलोखा/शांतता समिती बैठक घेतली जाते. मुस्लिम बांधवांच्या सणात जे कुर्बानी दिली जाते त्याकरिता जे शासनाचे प्रतिबंधक ठरवून दिले जाते त्याचे पालन मुस्लिम बांधवांनी करावे.
२)श्री ईश्वर दलाल काबरा भंडारा:- अपना भारत देश सभी जाती धर्मसे सजा हुआ है. व एकमेक के त्योहारों का आदर करता है.
३) खानसर पवनी:- भंडारा जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे. पवनी विदर्भाची काशी मानली जाते. हिंदू व मुस्लिम सन हे एकाच दिवशी येत आहेत. बकऱ्याची कुर्बानी देत असताना त्याचा त्रास दुसऱ्यांना होणार नाही या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्व मुस्लिम बांधवांनी लक्ष द्यावे.

४) संजय एकापुरे:- सारे भारतीय माझे बांधव आहेत या विचारांनी सर्वांनी वागणूक करावी येणारे एकादशी व बकरी ईद शांततेत पार पडावे.
५) श्रीमती इंद्रायणी कापगते:- शांतता हा पोलीस विभागाचा नाही तर जिल्ह्यातील सगळ्यांची जबाबदारी आहे.
६) युवराज उके:- यांनी सर्व धर्माचे लोकांना समानतेची वागणूक दिली पाहिजे.                   एकमेकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. सांप्रदायिक हे नेहमी त्रासदायक असते.
         जातीय एकोपा अबाधित राहावे याकरिता श्री गफ्फार भाई लाखनी यांनी श्री ईश्वरदयाल काबरा यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री ईश्वर दयाल काबरा यांनी श्री गफ्फार भाई लाखनी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रम हे विष्णू लोणारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे संकल्पनेतून करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय पोलीस अधीक्षक श्री लोहित मतांनी यांनी जिल्ह्यातील जनतेला सोशल मीडियावर आक्षेपार्ह येणारे मेसेज समोर फॉरवर्ड करू नये. असे गुन्हे करणारा व्यक्ती आढळून आल्यास लगेच पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे. मुस्लिम बांधवांना सांगितले की सनादरम्यान जे बकरीची बळी देतात ते बंदिस्त जागेमध्ये देण्यात यावे. इतर लोकांची भावना दुखावली जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच आषाढी एकादशीची मिरवणूक शांततेने पार पाडावी. जातीय सलोखा अबाधित राहावे ह्या करिता पोलीस विभाग सज्ज आहे. मा. जिल्हाधिकारी भंडारा मा. श्री योगेश कुंभेजकर यांनी भंडारा जिल्हा हा शांततेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियाचा वापर करून त्याचा गैरवापर करू नका, बकरी ईदच्या वेळी जनावरांची कत्तल केली जाते. तेव्हा पशुसंवर्धन विभागाची परमिशन घ्यावी. व आषाढी एकादशीची मिरवणूक शांततेने पार पाडावी. कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा श्री. डॉ. अशोक बागुल कार्यक्रमाचे धारदार सूत्रसंचालन वेळोवेळी त्यांनी केलेत. शेरोशायरी उपस्थितांना टाळ्याच्या गडगडाटामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व शांतता समिती अतिशय परिणामकारक उद्मोडक व चिरकाल स्मरणार्थ राहिली. आभार प्रदर्शन करून मा. जिल्हाधिकारी साहेबांचे अनुमती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
     सर्व उपविभागीय अधिकारी भंडारा, तसेच राखीव पोलीस अधिकारी श्री चौधरी, जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी/कर्मचारी व जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य, पत्रकार बंधू व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *