भंडारा रोड ते जवाहरनगर ऑर्डनन्स फैक्टरी मध्ये जाणारी रेलवे लाइन मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्यात त्या जमीनी त्यांच्या वारसानाला परत द्यावेत – चरणभाऊ वाघमारे
प्रतिनिधी भंडारा:- तुमसर चे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी भंडारा जिल्हाधिकारी महोदय यांना विनंतीपूर्वक निवेदन दिले आहे की भंडारा रोड ते जवाहरनगर ऑर्डनन्स फैक्टरी कड़े भंडारा शहरातुन रेल्वे लाइन गेली असून ज्या उद्देशासाठी रेल्वे लाइन करीता शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या होत्या त्या रेल्वे ट्रैक चा वापर काही वर्ष सुरु होता. आता त्या लाइनचा उपयोग जवाहरनगर फैक्टरी प्रशासनाने बंद केल्याने शासन शेत जमीनी सदर शेतकऱ्याला अथवा त्यांच्या वारसानाला परत करण्यात याव्यात जेणेकरून शेतकऱ्याना त्यांचा अधिकार परत मिळेल.
उक्त प्रकरणी तात्काळ दखल घेऊन कायदेशीर बाबी तपासून आपल्या स्तरावर प्रकरण सुरु करून सक्षम प्राधिकारी यांचे कड़े सहानुभूति पूर्वक निर्णय घेण्यासाठी सादर करावे अश्या प्रकारची नम्र विनंती माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांनी विकास फाउंडेशन तर्फे भंडारा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देउन केली आहे.