भंडारा पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! एकाच वेळी अनेक अड्डयांवर सर्जिकल स्ट्राईक; जुगार आणि दारू माफियांमध्ये मोठी खळबळ
Summary
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा कडक इशारा; ५३,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या आवळल्या मुसक्या! भंडारा: जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या ‘फ्री हॅण्ड’नंतर भंडारा पोलिसांनी गुन्हेगारांवर जोरदार प्रहार केला आहे. जिल्हयातील विविध […]
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा कडक इशारा; ५३,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या आवळल्या मुसक्या!
भंडारा:
जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या ‘फ्री हॅण्ड’नंतर भंडारा पोलिसांनी गुन्हेगारांवर जोरदार प्रहार केला आहे. जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार आणि दारू अड्डयांवर धाडी टाकून पोलिसांनी तब्बल ५३,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींना जेरबंद केले आहे.
🚨 तुमसर: जुगाराचा डाव उधळला; ६ जण अटकेत
तुमसर पोलिसांनी पिपरा परिसरात छापा टाकून ५२ तासपत्तीसह जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींना अटक केली. यात गणेश घणश्याम ईडपाते (३८), रोशन नानाजी सोनवाने (२४), वामन राम माने (२९), लोकेश भाऊराव लांजेवार (२३), नंदकिशोर सुखदेव सोनवाने (३४) आणि रंजीत हरीचंद हरदे (२४) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण १,६८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
🚨 वरठी आणि आंधळगाव: दारू तस्करांवर तुटून पडले पोलीस
वरठी: नेहरू वॉर्डातील प्रदिप अरुण वासनिक (३९) याला दुचाकीसह (MH 36 B 7455) पकडले. त्याच्याकडून १०,००० रुपयांची दुचाकी आणि ७,६०० रुपयांची देशी दारू असा एकूण १७,६०० रुपयांचा माल जप्त केला.
आंधळगाव: नागठाणा येथील रुपाली दिलीप शेंडे (४३) हिच्याकडून ७,८०० रुपयांची ३९ लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तर वासेरा येथील फरार आरोपी चिंतामन बारकु नेवारे (५२) याच्या अड्डयावर धाड टाकून २०,००० रुपयांचा २०० किलो सडवा मोहाफास आणि ड्रमसह एकूण २१,२०० रुपयांचा साठा नष्ट केला.
🚨 साकोली, अडयाळ आणि लाखांदूरमध्येही ‘धडाका’
साकोली: पाथरी येथील मिनल मंगेश नंदेश्वर (४५) हिच्याकडून संत्री देशी दारूचे नग जप्त करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
अडयाळ: नवेगाव ठाणे येथील सुवर्णा आनंदराव मेश्राम (५०) हिच्याकडून ३,००० रुपयांची १५ लिटर हातभट्टी दारू हस्तगत केली.
लाखांदूर: प्लॉट वॉर्ड क्र. ८ मधील राहुल प्रभाकर भोयर (३४) याला ७६० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांसह रंगेहात पकडले.
🚨 दिघोरी: टायगर ब्रँडची तस्करी रोखली
दिघोरी पोलिसांनी गणेश नरसैय्या गैणवार (४८) याच्यावर दोन कारवाया करत टायगर ब्रँड देशी दारूचे पाऊच जप्त केले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षकांचा ‘अलर्ट’
जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र गतीने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ७७७४९८०४९१
