भंडारा पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! जिल्ह्याच्या ६ पोलीस ठाण्यांत एकाच वेळी धडक कारवाई
Summary
तुमसरमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्डा उध्वस्त; ७५ हजारांच्या मुद्देमालासह सट्टेबाज आणि दारू तस्कर जेरबंद! भंडारा (वृत्तसेवा): जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेले युद्ध आता निर्णायक वळणावर आले आहे. एसपींच्या थेट आदेशावरून जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ‘कोम्बिंग […]
तुमसरमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्डा उध्वस्त; ७५ हजारांच्या मुद्देमालासह सट्टेबाज आणि दारू तस्कर जेरबंद!
भंडारा (वृत्तसेवा):
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेले युद्ध आता निर्णायक वळणावर आले आहे. एसपींच्या थेट आदेशावरून जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. यात तुमसरमधील मोठा जुगार अड्डा उध्वस्त करण्यासोबतच, हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण ७५,७५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
💥 तुमसरमध्ये जुगाराचा डाव उधळला; ५ अटकेत, २ फरार!
तुमसर पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी:
अटकेतील आरोपी: राकेश बोकडे, इम्रान शेख, जितू राणे, संजय साठवणे आणि पीयूष जायस्वाल.
फरार आरोपी: संदीप ठाकरे आणि योगेश गायधने (पोलीस शोध घेत आहेत).
जप्त मुद्देमाल: घटनास्थळावरून ५२ पत्त्यांसह फळावरची रोख आणि आरोपींच्या अंगझडतीतून १५,२०० रुपये, तसेच ४ महागडे मोबाईल फोन असा एकूण ३५,५५० रुपयांचा माल जप्त केला.
🚨 दारू तस्करांचे धाबे दणाणले; १४० लिटर दारू जप्त!
हातभट्टी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी जोरदार प्रहार केला आहे:
तुमसर (नवरगाव): रिंकू राम अग्रवाल याच्याकडून तब्बल १४० लिटर मोहफूल दारू जप्त करण्यात आली. ज्याची किंमत २८,००० रुपये आहे.
कारधा: नेहरूनगर वॉर्डात संगीता बागडे या महिलेच्या घरातून १० लिटर दारू आणि मातीच्या माठात लपवलेली १० लिटर दारू असा ४००० रुपयांचा माल हस्तगत केला.
जवाहरनगर (पिपरी): रोहित चवरे याला २० लिटर हातभट्टी दारूसह ताब्यात घेतले.
भंडारा शहर: बेला येथील राजकुमार फुले याला कल्याण सट्टा पट्टी लिहिताना रंगेहात पकडले.
गोबरवाही अन् सिहोरा: ७४ वर्षीय रामनाथ चौधरी आणि मिताराम वघारे यांच्यावर कारवाई करून हातभट्टीचा साठा जप्त केला.
खाकीचा सज्जड दम: “धंदे बंद करा, अन्यथा तुरुंगात जा!”
जिल्ह्यात कुठेही सट्टा, जुगार किंवा हातभट्टी दारू सुरू असल्याचे आढळल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा श्री. नूरुल हसन यांनी दिला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ठाणेदारांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
संपर्क: 7774980491
