BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा पोलिसांचा ‘रुद्र अवतार’! एकाच वेळी ८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धाडी; ३.७३ लाखांच्या मालासह गुन्हेगार गारद! ​एसपी नूरुल हसन यांचा कडक प्रहार; जुगार आणि दारू माफियांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

Summary

भंडारा: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचललेल्या पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या ‘स्पेशल प्लॅन’ने गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील भंडारा, कारधा, तुमसर, साकोली यांसह आठ पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी धाडी टाकून दारू आणि जुगार तस्करांना जेरबंद […]

भंडारा:
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचललेल्या पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या ‘स्पेशल प्लॅन’ने गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील भंडारा, कारधा, तुमसर, साकोली यांसह आठ पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी धाडी टाकून दारू आणि जुगार तस्करांना जेरबंद केले. या महा-कारवाईत एकूण ३,७३,१८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या सपाट्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत.
​कारवाईचा सविस्तर रिपोर्ट: जिल्ह्यात कुठे काय घडले?
​१. भंडारा व कारधा: सडवा मोहफासाचे जाळे उद्ध्वस्त
​भंडारा: मोहदुरा येथील ६० वर्षीय महिला आरोपी आणि सिल्ली येथील चंद्रकांत विश्वनाथ देशमुख (३६ वर्षे) याला देशी दारूच्या साठ्यासह अटक.
​कारधा: येथे मोठी कारवाई करत यशवंत डोमा मेश्राम (५६ वर्षे, करचखेडा), वैभव मानिक वासनीक (२५ वर्षे, मकरढोकडा) आणि नवेगाव (कोका) येथील ४१ वर्षीय महिला आरोपी यांच्याकडून तब्बल १.५७ लाखांचा सडवा मोहफास आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले.
​२. तुमसर, सिहोरा व गोबरवाही: गावठी दारू अड्ड्यांवर प्रहार
​तुमसर: पिपरा आणि रवीदास वॉर्डातील दोन महिला आरोपींसह अंकुश मनोहर नेरकर (४० वर्षे, डोंगरला) यांच्याकडून ५३ हजारांचा मोहफूल रसायन साठा जप्त.
​सिहोरा व गोबरवाही: थेरकर टोलीतील महिला आरोपी आणि डोंगरी बुज येथील कैलास नामदेव सनेसर (६५ वर्षे) यांना हातभट्टीच्या दारूसह बेड्या ठोकल्या.
​३. साकोली व लाखनी: मोटारसायकलसह तस्कर जाळ्यात
​साकोली: सानगडी, पळसगाव, खांबा आणि एकोडी येथील महिला आरोपींसह मनोज श्रीरामजी उपरीकर (३४ वर्षे) व अशोक गोपीचंद लोहबरे (६३ वर्षे) यांना देशी दारू विकताना रंगेहात पकडले.
​लाखनी: मोरगाव येथील प्रमोद श्रीराम वालकर (४५ वर्षे) याला ७१ हजारांच्या मालासह (दुचाकीसह) आणि केसलवाडा येथील पिंटू सोविंदा वाढई (२५ वर्षे) याला अटक केली.
​अड्याळ: वाकेश्वर येथील ४७ वर्षीय महिलेकडून देशी दारू जप्त.
​लाखांदूरमध्ये जुगाराचा डाव उधळला!
​लाखांदूर पोलिसांनी पारडी दिघोरी आणि पालेपेंढरी परिसरात धाड टाकून जुगार खेळणाऱ्या शुभम लुभाषरावजी मारगाये (२९ वर्षे), गणेश नागोराव नान्हे (१९ वर्षे), उमेश रमेश ठाकरे (२४ वर्षे) आणि चेतन सुनील दोनाडकर (२४ वर्षे) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून टीव्हीएस अपाची आणि होंडा शाईन या दोन दुचाकींसह एकूण १,३०,६४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
​खाकीचा कडक संदेश
​ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ठाणेदार व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. “अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड दमच या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

​ब्युरो रिपोर्ट: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *