BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा पोलिसांचा ‘धडाका’! जुगार आणि दारू माफियांवर खाकीचा सर्जिकल स्ट्राईक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Summary

​पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने जिल्ह्याभरात खळबळ; जुगाराचे डाव उधळले अन् गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त! ​भंडारा: जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट आदेशावरून तुमसर, पवनी, सिहोरा […]

​पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने जिल्ह्याभरात खळबळ; जुगाराचे डाव उधळले अन् गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त!
​भंडारा:
जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट आदेशावरून तुमसर, पवनी, सिहोरा आणि लाखनी परिसरात पोलिसांनी ‘स्पेशल ऑपरेशन’ राबवले. या धडक मोहिमेत जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी १ लाख २९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

​तुमसरमध्ये जुगाराचा डाव उधळला!
​तुमसर पोलिसांनी चिचोली परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून नगदी ५ हजार २५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पवनी येथेही सट्टापट्टी चालवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी जाळ्यात ओढले आहे.

​सिहोरा अन् तुमसरमध्ये ‘मोहाफास’चा मोठा साठा हस्तगत!
​दारू तस्करांविरुद्धच्या मोहिमेत सिहोरा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली. सोनड्या येथील फरार आरोपी देवानंद ऊर्फ कारू नागपुरे याच्या ठिकाणावरून ४५० किलो सडवा मोहाफास जप्त करण्यात आला, ज्याची किंमत ९० हजार रुपये आहे. तसेच तुमसरच्या नवरगाव परिसरातूनही ३२ हजार रुपयांचा ३२० किलो मोहसळवा हस्तगत करण्यात आला आहे.

​कारवाईचा धावता आढावा:
​जुगार अड्डे: तुमसर आणि पवनी येथे धाडी टाकून ६,३७५ रुपयांचा माल जप्त.

​दारू अड्डे: तुमसर, सिहोरा, लाखनी आणि पवनी परिसरात १,२३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

​मुद्देमाल: पोलिसांनी देशी दारूचे पव्वे, सडवा मोहाफास आणि नगदी रोख असा एकूण १,२९,३७५ रुपयांचा माल पंचासमक्ष जप्त केला आहे.

​फरार आरोपींचा शोध सुरू!
​या कारवाईत काही आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. लाखनी आणि पवनी येथेही अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​’अवैध धंदे चालवणाऱ्यांची खैर नाही’ – पोलीस प्रशासन
​सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या ठाणेदार आणि पोलीस अंमलदारांनी पार पाडली. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी यापुढेही अशाच ‘सिनेस्टाईल’ कारवाया सुरू राहतील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

​ब्युरो रिपोर्ट: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *