भंडारा पोलिसांचा ‘धडाका’! जुगार आणि दारू माफियांवर खाकीचा वज्रप्रहार; दीड लाखांचा माल जप्त तुमसर ते साकोलीपर्यंत पोलिसांचे धाडसी ‘ऑपरेशन’; ७ जुगारी आणि ३ दारू तस्कर जेरबंद!
Summary
भंडारा (वृत्तसेवा): जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी सुरू केलेली ‘क्लीन-अप’ मोहीम आता अधिक तीव्र झाली आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जुगार आणि दारू तस्करांकडून एकूण १,५२,४४३ […]
भंडारा (वृत्तसेवा):
जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी सुरू केलेली ‘क्लीन-अप’ मोहीम आता अधिक तीव्र झाली आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जुगार आणि दारू तस्करांकडून एकूण १,५२,४४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
🎥 गोबरवाहीमध्ये रंगेहात पकडले जुगारी; वाहनांसह १.२९ लाखांचा माल जप्त!
गोबरवाही पोलिसांनी धुटेरा परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी लक्ष्मण लांजेवार, वासुदेव बोरकर, हिरेंद्र चैरागडे यांच्यासह ७ जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे यात मध्यप्रदेशातील कटंगी येथील एका आरोपीचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून:
दोन महागड्या दुचाकी (ड्रीम युगा आणि ज्युपिटर मोपेड)
मोबाईल फोन्स आणि नगदी रक्कम असा एकूण १,२९,०७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जुगाराचा डाव उधळून लावला. तसेच तुमसरमध्ये कमलेश चोपकर याला सट्टा घेताना जेरबंद केले.
🚨 साकोलीत दारू तस्कराचा पर्दाफाश; ५०० पव्वे जप्त!
साकोली पोलिसांनी लवारी परिसरात मोठी कारवाई करत गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी शिवम गुन्नेवार याला पकडले. त्याच्याकडून २०,००० रुपये किमतीचे देशी दारूचे तब्बल ५०० नग पव्वे जप्त करण्यात आले आहेत. तसेच किन्ही (एकोडी) येथील आसाराम उके याच्याकडूनही देशी दारूचा साठा हस्तगत केला.
📍 कारधामध्येही कारवाई:
कारधा पोलिसांनी दवडीपार परिसरात ५९ वर्षीय महिला आरोपीच्या अड्ड्यावर धाड टाकून मोहफुलाची हातभट्टी दारू जप्त केली आहे.
⚠️ खाकीचा अल्टिमेटम: अवैध धंदेवाल्यांनो, आता तुमची खैर नाही!
पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ठाणेदारांनी ही मोहीम राबवली. “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदा सुरू असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
संपर्क: 7774980491
