क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्ह्यात दारू व जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक – ₹5,70,700 चा मुद्देमाल जप्त

Summary

भंडारा – जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याच्या निर्देशानुसार जिल्हाभरात मोठी कारवाई करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांनी दारू व जुगार अड्ड्यांवर धाड टाकत एकूण ₹5,70,700 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. — कारवाईचा तपशील […]

भंडारा – जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याच्या निर्देशानुसार जिल्हाभरात मोठी कारवाई करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांनी दारू व जुगार अड्ड्यांवर धाड टाकत एकूण ₹5,70,700 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईचा तपशील

1. भंडारा पोलीस स्टेशन

आरोपी: निलकंठ गोपाळराव हर्षे, वय 65, रा. गांधी वार्ड, वरठी

जप्त मुद्देमाल: नगदी ₹950, सट्टापट्टी कागद व डाटा पेन – एकूण ₹956

2. पवनी पोलीस स्टेशन

आरोपी: भागवत थेरे, सुरेश हटवार, रमेश घेरे, ज्ञानेश्वर जिभकाटे, मधुकर हटवार, लक्ष्मण मेश्राम, विलास इखार

जप्त मुद्देमाल: पत्त्यांचा सेट आणि नगदी – ₹3,255

3. वरठी पोलीस स्टेशन

आरोपी: लंकेश्वर भुरे

जप्त मुद्देमाल: देशी दारूचे नऊ पाउच – ₹630

4. कारधा पोलीस स्टेशन

महिला आरोपी

जप्त मुद्देमाल: 12 लिटर मोहाफुलाची दारू – ₹2,400

5. कारधा पोलीस स्टेशन (दुसरी कारवाई)

आरोपी: राजकुमार अशोक उके

जप्त मुद्देमाल: एकूण 17 लिटर मोहाफुलाची दारू – ₹3,400

6. करडी पोलीस स्टेशन

आरोपी: मनोज बागडे

जप्त मुद्देमाल: 15 लिटर मोहाफुलाची दारू – ₹3,000

7. तुमसर पोलीस स्टेशन

आरोपी: राकेश सेवक प्रत्येकी

जप्त मुद्देमाल: 1,200 किलो सडवा मोहाफुल – ₹84,000

8. तुमसर पोलीस स्टेशन (दुसरी कारवाई)

आरोपी: रामु कामथे

जप्त मुद्देमाल: 6 लिटर मोहाफुलाची दारू – ₹1,200

9. सिहोरा पोलीस स्टेशन (पहिली कारवाई)

आरोपी: जयराम बेरकर (फरार)

जप्त मुद्देमाल: 1,025 किलो सडवा मोहाफुल, 30 लिटर दारू व इतर साहित्य – ₹2,15,000

10. सिहोरा पोलीस स्टेशन (दुसरी कारवाई)

महिला आरोपी (फरार)

जप्त मुद्देमाल: 525 किलो सडवा मोहाफुल – ₹1,05,000

11. सिहोरा पोलीस स्टेशन (तिसरी कारवाई)

आरोपी: प्रवीण बेरकर

जप्त मुद्देमाल: 150 किलो सडवा मोहाफुल – ₹1,50,000

12. सिहोरा पोलीस स्टेशन (चौथी कारवाई)

आरोपी: विकास बन्सोड

जप्त मुद्देमाल: 10 लिटर मोहाफुलाची दारू – ₹1,000

13. आंधळगाव पोलीस स्टेशन

आरोपी: राहुल बवैकर

जप्त मुद्देमाल: 2.5 लिटर मोहाफुलाची दारू – ₹500

14. पवनी पोलीस स्टेशन (दुसरी कारवाई)

महिला आरोपी

जप्त मुद्देमाल: 11 बाटल्या देशी दारू – ₹880

 

एकूण कारवाई

दारू अड्डे: ₹5,66,490 किमतीचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्डे: ₹4,290 किमतीचा मुद्देमाल जप्त

एकूण: ₹5,70,700 किमतीचा माल जप्त

 

पोलिसांचे मार्गदर्शन

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या देखरेखीखाली झाली. स्थानिक ठाणेदार व पोलीस पथकांनी समन्वय साधून ही यशस्वी मोहीम राबवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *