BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्ह्यात दारू व जुगार अड्ड्यांवर मोठी धाड – ₹5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Summary

भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांनी मिळून एकूण ₹5,05,131 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदे समुळ नष्ट […]

भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांनी मिळून एकूण ₹5,05,131 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध धंदे समुळ नष्ट करण्याच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी ही संयुक्त मोहीम राबविली.

🔹 जुगार अड्ड्यांवरील कारवाई

पोलीस स्टेशन जवाहरनगर, तुमसर, पवनी आणि अड्याळ येथे एकत्रित धाड टाकण्यात आली. या कारवाईत एकूण ₹4,41,045 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यात सट्टापट्टीचे कागद, नगदी रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि अन्य साहित्याचा समावेश आहे.

🔹 दारू अड्ड्यांवरील कारवाई

पोलीस स्टेशन भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, करडी, वरठी, तुमसर, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, पालांदुर, पवनी आणि लाखांदुर यांनी संयुक्त कारवाई करून विविध ठिकाणांहून देशी दारू, हातभट्टी दारू, तसेच दारू निर्मितीमध्ये वापरले जाणारे रसायन असा एकूण ₹91,085 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दारू प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून, काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

🔹 एकूण कारवाईचा आढावा

दारू आणि जुगार अड्ड्यांवरील धाडीत मिळून ₹5,05,131 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या ठाणेदार आणि पोलीस अंमलदारांनी केली.

पोलीस विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की,
“अवैध धंद्यांची माहिती त्वरित पोलिसांना कळवा. समाजातून अशा गैरकृत्यांचे उच्चाटन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *