भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन मधील मा. पोलीस निरीक्षक तुमसर यांच्या आशिर्वादाने सट्टा, जुवा, मोहफुल दारु चा जोरात धंदा सुरू आहे असे निदर्शनास आले.

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्कचे
बाविस लाख वाचक असलेला भारताचा नंबर वन न्युज नेटवर्क –
प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन मधील मा. पोलीस निरीक्षक तुमसर यांच्या आशिर्वादाने सट्टा, जुवा, मोहफुल दारु चा जोरात धंदा सुरू आहे असे निदर्शनास आले.
सविस्तर बातमी अशी आहे कि रेती माफिया आपल्या बळावर पो.स्टे. च्या मार्फत अवैध वाळू उपसा करतात व जास्त किंमतीत वाळु नागपुर किंवा मोठमोठ्या शहरात पुरवठा करतात ह्यावर तुमसर पो.स्टेशन ने आळा घालण्याची गरज आहे.
मोहफुल दारु सुध्दा जोमात सुरु आहे.
सट्टा, जुगार सुध्दा जोमात सुरू आहे,
नवीन विद्यार्थी ह्या धंद्यात सलग्न होऊन आपल्या आयुष्याचा बंट्याभार करित आहेत.
येणाऱ्या काळात चोरी, बलात्कार ,गुंडगिरी चे प्रमाण वाढुन सामान्य माणसाचे जिवन जगने कठीण होणार आहे.
बावनकर चौक व जुणा बसस्ट्यांन्ड चौक ईथे नेहमी वाहतूक नियंत्रण पुलीस असने आवश्यक आहे.ह्या दोन्ही चौकात वाहतूक पोलीस न रहाने ही बाब हास्यास्पद आहे.
तुमसर तालुक्यातील विचारवंत अनुमान लावत आहेत अवैध प्रवासी वाहतूक, अवैधरित्या रेती वाहतूक व काळा मालाला पाठबळ मिळेल.
ह्या बाबीकडे ग्रुह मंत्रालयाने लक्ष देणे काळाची गरज आहे.
(सविस्तर माहिती पुढल्या बातमी मध्ये सादर)