भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेपासुन पिण्याच्या पाण्यापासून वंचित

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला माहिती प्राप्ती नुसार गेल्या दोन दिवसांपासून नाकाडोंगरी गावात नळ योजनेचा पाणी पुरवठा झाला नाही.
सविस्तर वृत्त असे की पोलीस योध्दा न्युज नेटवर्क नि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की बावनथडी नदिवरील पोटामध्ये बिघाडामुळे पाणी पुरवठा झाला नाही.त्यामुळे पाणी आलेला नाही.
कधी पाईप लाईन फुटली,कधी इलेक्ट्रिक लोड सेंडीग समस्या,तर कधी पंप दुरुस्ती चे काम.
यांचा केव्हा पर्यंत मेंटेनन्स चा काम चालेल?
नळ धारकांना केव्हा पर्यंत ह्या समस्या पासुन सामोरे जावे लागेल.
स्थानिक नागरिकांनी मांग केली कि लवकरात लवकर जे काही दुरुस्ती आहे ति करून जनतेला पाणी पुरवठा करण्यात यावा.
समाचार प्रकाशित होण्यापर्यंत पाणी पुरवठा झाला नाही.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259