भंडारा जिल्ह्याची ‘खाकी’ सुसाट! १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी प्रचंड मोठी छापेमारी
Summary
सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; सिहोरा आणि तुमसरमध्ये दारू माफियांचे रॅकेट उध्वस्त, जिल्ह्यात खळबळ! भंडारा (वृत्तसेवा): जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या ‘फ्री हॅण्ड’नंतर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. […]
सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; सिहोरा आणि तुमसरमध्ये दारू माफियांचे रॅकेट उध्वस्त, जिल्ह्यात खळबळ!
भंडारा (वृत्तसेवा):
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या ‘फ्री हॅण्ड’नंतर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. जिल्ह्यातील तब्बल १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी राबवलेल्या मोहिमेत जुगार आणि दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ३ लाख १७ हजार ६५५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
🚨 सिहोरा आणि तुमसरमध्ये सर्वात मोठा प्रहार!
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई सिहोरा आणि तुमसर भागात झाली आहे:
सिहोरा: पोलिसांनी सोड्या येथील उमाशंकर गौपाले याच्याकडून तब्बल ६०० किलो मोहाफास रसायन आणि २० लिटर दारू असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तुमसर: अंकुश नेरकर याच्या अड्ड्यावर धाड टाकून ३७५ किलो सडवा मोहाफास (७५ हजार रु.) हस्तगत केला.
गोबरवाही: अजय बिनझाडे याच्याकडून ३०० किलो मोहाफास (६० हजार रु.) जप्त करून पोलिसांनी दारू गाळणाऱ्यांच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
👊 १५ पोलीस ठाण्यांचा एकाच वेळी ‘ॲक्शन मोड’
भंडारा शहर, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, वरठी, तुमसर, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, पालांदूर, पवनी, लाखांदूर आणि अड्याळ या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई केली.
दारू तस्कर जेरबंद: ठिकठिकाणी ६० ते ७० वर्षांच्या महिला आणि पुरुष आरोपींकडून गावठी हातभट्टी आणि देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
सट्टा-जुगार उध्वस्त: भंडारा शहरात निशांत रामटेके आणि लाखांदूरमध्ये मिलिंद खोब्रागडे व प्रवीण नान्हे यांना सट्टा पट्टी लिहिताना रंगेहात पकडून रोख रक्कम जप्त केली.
👮 वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांच्या मुसक्या आवळल्या!
या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी गुन्हेगारांच्या वयाचा मुलाहिजा न ठेवता कायद्याचा दंडुका चालवला आहे. ३० वर्षांच्या तरुणांपासून ते ७४ वर्षांच्या वृद्धांपर्यंत जे अवैध धंद्यात सामील होते, त्या सर्वांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
खाकीची सज्जड तंबी!
पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. “जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही तर केवळ सुरुवात आहे, यापुढे कारवाई अधिक तीव्र होईल,” असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
संपर्क: 7774980491
