भंडारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टी ची सभा संपन्न
Summary
स्वार्थी करमकर/विशेष प्रतिनिधी तालुका तुमसर:- आज दि. 18/09/2021 रोज शनिवारला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची सभा ‘राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कार्यालय, भंडारा’ येथे संपन्न झाली. सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्ये यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, संघटने मार्फत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी […]
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210918-WA0016.jpg)
स्वार्थी करमकर/विशेष प्रतिनिधी
तालुका तुमसर:- आज दि. 18/09/2021 रोज शनिवारला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची सभा ‘राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कार्यालय, भंडारा’ येथे संपन्न झाली. सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्ये यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, संघटने मार्फत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात तसेच संघटनेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे.
तसेच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्री. सुनील फुंडे यांनी मार्गदर्शन करतांनी विद्यार्थी हा राजकारणाचा पाया असुन *महाविद्यालियन निवडणुकिपासुन विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग घ्यावा असे आव्हान केले तसेच राजकारणात सहभाग घेऊन सुध्दा अभ्यासाकडे लक्ष दयावे अशी सुचना दिली. यावेळी श्री. जयंत वैरागडे प्रदेश महासचिव, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. यशवंत सोनकुसरे, विद्यार्थी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. स्वप्नील नशीने, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. कु. नेहा शेन्डे, यांनी जिल्हा व शहर प्रतिनिधी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.