BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्हा एस.पी. कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकार कायद्याची अवमानना. सुनावणी पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ अशोक बागुल यांनी आपिलार्थी यांना दिली अश्लील शिवीगाळ तसेच डटावनी. सुनावणी दरम्यान बनावट कागपत्रांचे सादरीकरण. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केली माहिती अधिकार कायद्याची अवमानना.

Summary

प्रतिनिधी भंडारा        प्रकरण असे की लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी दिनांक ०२-०६-२०२३ वार शुक्रवार ला भंडारा एस पी कार्यालयात वरठी पोलीस स्टेशन वाहन लोग बुक वर खालील प्रमाणे ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज […]

प्रतिनिधी भंडारा
       प्रकरण असे की लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी दिनांक ०२-०६-२०२३ वार शुक्रवार ला भंडारा एस पी कार्यालयात वरठी पोलीस स्टेशन वाहन लोग बुक वर खालील प्रमाणे ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केला होता.
पोलीस स्टेशन वरठी येथील वाहन क्रमांक एम. एच. ३६/२११८ टाटा सुमो च्या लॉगबुक च्या खालील पानांची छायांकित प्रत मिळण्याबाबद
दिनांक ०१-०१-२०२०
दिनांक ०२-०१-२०२०
दिनांक ०३-०१-२०२०
दिनांक ०२-०३-२०२०
दिनांक ०३-०३-२०२०
दिनांक ०४-०५-२०२०
दिनांक ०४-०८-२०२०
दिनांक २७-०८-२०२०
दिनांक २८-०८-२०२०
दिनांक २८-०१-२०२१
दिनांक २९-०१-२०२१
दिनांक ०१-०७-२०२१
दिनांक ०२-०७-२०२१

प्रस्तुत माहिती ही ३० दिवसांच्या आत देण्याची कृपा करावी.
प्रस्तुत माहिती पीडीएफ फाईल स्वरूपात ईमेल वर देण्याची कृपा करावी.
(शासन निर्णय संकेतांक:२०१७१११७११३२२९३००७ अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून १० दिवसात माहितीसाठी कळवावे.)

३८ दिवसांचा कालावधी होऊनही माहिती संबंधाने संबंधित विभागातून तसेच भंडारा एस डी पी ओ कार्यालयातून माहिती संबंधाने कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही. म्हणून अमर वासनिक यांनी दिनांक ०९-०७-२०२३ रोज रविवारला जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा येथे वरठी पोलीस स्टेशन लॉग बुक ची माहिती न मिळाल्याने ऑनलाईन प्रथम अपील केले.

      आज दिनांक ३१-०७-२०२३ रोजी प्रथम अपिलाची सुनावणी होती प्रथम अपिलाची सुनावणी खूप उशिरा अर्थात ०२:३० च्या दरम्यान लागली पूर्वी सुनावणी होण्याअगोदर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ अशोक बागुल यांनी अपिलार्थी अमर वासनिक यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले तसेच,”तू ही माहिती का मागितली?” तुझा माहिती मागण्याचा उद्देश काय? तुझा धंदा काय? असे विचारले असता अपिलार्थी अमर वासनिक यांनी शांतपणे उत्तर दिले तसेच संबंधित माहिती मध्ये संबंधित पोलीस अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे पुरावे असून माहिती संबंधाने मला कोणतेच पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यावर डॉ अशोक बागुल यांनी प्रतिप्रश्न केला की काय भ्रष्टाचार केला आहे. त्यावर अमर वासनिक यांनी शांतपणे उत्तर दिले,” ते माहिती प्राप्त झाल्यानंतरच कळेल.” यावर डॉ अशोक बागुल यांनी अपिलार्थी अमर वासनिक यांना अश्लील शिवीगाळ करून विभिन्न गुन्हे दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. तेवढ्यात प्रथम अपिलाच्या सुनावणीला बोलावण्यात आले असता डॉ अशोक बागुल आणि अपीलार्थी अमर वासनिक यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या केबिन मध्ये प्रवेश केला. या सुनावणी मध्ये बनावट पत्र सादर करण्यात आले व सांगण्यात आले की प्रस्तुत माहितीचे पत्र अर्जदार अमर वासनिक यांना दिले होते परंतु प्रस्तुत बनावट पत्र हे अमर वासनिक यांना प्राप्त झालेच नव्हते असे अमर वासनिक यांनी सांगितले तरी सुद्धा माहितीचे शुल्क भरून आपण माहिती उचलावी असा आदेश अरविंद कातकडे यांनी काढला असता अपिलार्थी अमर वासनिक यांनी प्रश्न केला की आपण माहितीचे शुल्क कोणत्या कायद्याचा आधारावर मागत आहात. त्यावर प्रथम अपिलीय अधिकारी ईश्वर कातकडे सर यांनी उत्तर दिले की शासनाचा जी आर आलेला आहे की उशिरा का होईना अपील केल्यावरही माहितीचे शुल्क भरणे हे बंधन कारक आहे.
प्रस्तुत जी आर अपिलार्थी अमर वासनिक यांनी मागितला असता कातकडे सर तसेच डॉ अशोक बागुल यांनी,”तू नव्याने माहिती अधिकार अर्ज करू शकतोस” असे सांगितले.
आणि सुनावणी आदेश पार पडला अमर वासनिक यांना नाईलाजाने माहिती उशिरा मिळूनही माहितीचे शुल्क भरून माहिती प्राप्त करावी लागली.
त्याची पावती सुद्धा अमर वासनिक यांना देण्यात आली आहे.

      अशा प्रकारे भंडारा पोलीस विभाग, एस पी कार्यालय भंडारा येथे माहिती अधिकाराची नेहमीच अवमानना होत असते.
उपअधीक्षक डॉ अशोक बागुल यांनी दिलेल्या अश्लील शिवीगाळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी केलेल्या माहिती अधिकाराची अवामानना संदर्भात अमर वासनिक हे नागपूर खंडपीठात दाद निश्चित मागणार परंतु तत्पूर्वी अमर वासनिक लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेतर्फे भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणावर बसणार अशी चेतावणी अमर वासनिक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *