ब्राह्मण सोडले तर सर्व भारतीय हे मुळचे बौध्द आहेत. – चंद्रशेखर भारती यांनी मांडले विचार!

इ.स.पूर्व सात हजार ते तीन हजार दरम्यान भटके आणि रानटी आर्य भारतात आले. त्याकाळात केवळ सिंधू संस्कृती व द्रविड संस्कृती भारतात अस्तित्वात होती. या दोन्ही संस्कृतीचे पुरावे आजही मिळतात. परंतु वैदिक हे भटके जीवन जगणारे व असंस्कृत असल्याने ते स्वतः ला वेगळे समजत. ते रानटी प्रवृतीचे असल्याने त्यांना कोणताही धर्म वा संस्कृती असण्याचे कारण नाही. परिणामी आज जे आपण आहोत, ते सिंधू संस्कृती वा द्रविड संस्कृती पैकी एका संस्कृतीचे आहोत. आजचा एस.सी., एस.टी., एन.टी.,एसबीसी., ओबीसी, मराठा हा मूळ भारतीय समाज सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे. आपल्याला ब्राह्मणांनी जरी जाती-जातीत विभागले असले, तरी आपली आडनावे सारखीच आहेत. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत,तर द्रविड संस्कृतीचे लोक दक्षिण भारतात आढळतात. मात्र वैदिक संस्कृतीचे कोणतेही पुरावे आजपर्यंत आढळले नाहीत.
परिणामी आपण इथले मूळ रहिवासी असून एकमेकांच्या बंधूसमान आहोत. भारतात म्हणजेच जंबूद्विपात जैन आणि बौध्द धर्माची स्थापना झाल्यावर जैन तत्वज्ञान अतिशय टोकाचे असल्याने आणि बौध्द तत्वज्ञान आचरणास सहज सोपे असल्याने तत्कालीन लोक बौध्द धर्माचे आचरण करु लागले.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि स्रियांना समानतेचा दर्जा या तत्वज्ञानामुळे बौध्द धर्म वा-यासारखा भारतभर पसरला.
जंबूद्विपाचा म्हणजेच भारताचा तो काळ सुवर्णमय असा होता. संपूर्ण जंबूद्विपात बौध्दमय जीवनसंहिता पाळली जात होती. कोणत्याही प्रकारचे मंदिर वा देव अस्तित्वात नव्हता. सगळीकडे केवळ बुध्दांच्या लेण्या खोदल्या जात होत्या. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात सुरु झालेली ही बुध्दलेण्या खोदण्याची परंपरा पार सातवाहन राजांनंतरही चालत होती. शककर्ता सातवाहन राजा गौतमीपूत्र सातकर्णीने तर नाशिक, कार्ले-भाज्या, तेर-तगर, महाड, शुर्पारक, कल्याण- लोणाड या ठिकाणी काळ्या कातळात बुध्द लेण्या खोदल्या आहेत.
बुध्दांच्या समतावादी तत्वज्ञानाचा इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत प्रभाव होता. बुद्ध धर्मामुळे धर्म ही संकल्पना याच काळात उदयास आली. तोपर्यंत या विश्वाला धर्म हा शब्द माहित नव्हता. ( धर्म या शब्दाचा निर्मितीकाळ व्युत्पत्ती कोषात पहा.) ख्रिश्चन, मुस्लिम, शीख हे धर्म नंतरचे आहेत. तेव्हा तर हिंदू हा शब्दही अस्तित्वात नव्हता. हिंदू हा शब्द जैन वा बौध्द धर्माच्या साहित्यात आलेला आढळत नाही. वेद, उपनिषदे, पुराणे, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता या साहित्यातही ( ४ वेद, १८ पुराणे, ६४ स्मृतीग्रंथातही) आलेला नाही. पुष्यमित्र शुंगाचा गुरु पतंजली, मनु आणि शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरुन ठेवला नाही.हिंदू शब्द पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही.
वैदिकांनी बुध्दांच्या समतावादी तत्वज्ञानाला सुरुंग लावण्यासाठी सर्वप्रथम इ.स.पूर्व तीनशेच्या जवळपास म्हणजे बुध्दांच्या नंतर चार वेदांची निर्मिती केली. (संदर्भ- ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी ने देखील वेद फार जूने आहेत हे अमान्य केले आहे. जगातील पहिला इतिहासलेखक म्हणून हिरोडोट्स याला ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीने मान्यता दिली आहे. हिरोडोट्स ने इ.स पूर्व 456 मध्ये ‘हिस्टोरिका’ चे लेखन केले, ते जगातील सर्वात पहिले लिखित साहित्य आहे.) वेद जर खरोखरच फार प्राचीन असते, तर ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना पहिले लिखित साहित्य म्हणून मान्यता दिली असती. परंतु त्यांनी छाननी केल्यानंतर असे आढळले की हे सर्व लेखन नंतरचे आहे.
या वेदांमध्ये चार वर्णांची निर्मिती करुन वैदिकांनी स्वतः ला सर्वोच्च स्थानी ठेवून बाकीच्यांना निम्न स्थान दिले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र असे चार वर्णांची निर्मिती केली. भारतीयांच्या व्यवसायावरुन त्यांना जातीव्यवस्थेत स्थान दिले. वैदिकांनी समाजात हळूहळू पूजा-अर्चा सुरु करुन चातुर्वर्ण्य व्यवस्था राबवायला सुरुवात करुन बुध्दांच्या समतावादी समाजरचनेला हळूहळू विषमतावादी व दैववादी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्मृती, पुराणे, उपनिषदे, रामायण व महाभारत या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.विष्णू,शंकर, लक्ष्मी, सरस्वती,दुर्गा, दत्तगुरु, गणपती,राम, हनुमान या व इतर देवतांची निर्मिती करुन मंदिराचे निर्माण करुन जनतेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.(इथे फक्त बुध्द होऊन गेला, म्हणून आपल्याला सगळीकडे बुध्दांच्या लेण्या खोदलेल्या दिसतात. इतर देवतांच्या नाहीत. कैलास लेणे अगदीच अलीकडेचे आहेत.म्हणजे इ.स. ७५७ ते ७८३. राष्ट्रकुट राजा कृष्णाने हिंदू देवांची लेणी खोदली आहे. ज्या ज्या लेण्या हिंदू देवतांच्या आहेत, त्या अलीकडे खोदलेल्या आढळून येतात. इसवी सना पूर्वीच्या नव्हे.) यामुळे जनतेला भूरळ पडून ते हळूहळू कर्मकांडे करु लागली. यातूनच पुढे हळूहळू समतावादी बुध्द धर्म मागे पडून लोक कर्मकांड असणा-या वैदिक धर्माकडे वळू लागली.
बहुसंख्य हिंदू लोक, हिंदू शब्दाचे मुळ त्याची उत्पत्ती या संबंधात अनभिज्ञ आहेत.
हिंदू धर्माचा उल्लेख सर्वप्रथम मोरक्कोचा मुस्लिम प्रवासी इब्न बतुता यांच्या ‘रिहला’ या पुस्तकात आलेला आहे. सिंधू नदीच्या पलिकडे रहाणारे ते हिंदू. या नात्याने बतुताने पुस्तकात *अल हिंद* हा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला आहे. त्याने तुघलकाच्या दरबारी काझी म्हणून ६ वर्षे काम केले. ‘अल हिंद’ हा शब्द अरेबिक आहे. इब्न बतुता याचा कालावधी १३०४ ते १३६९ हा आहे. हिंदू हा पर्शियन शब्द असून तो सिंधू या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पर्शियन सिंधू नदीचा उल्लेख हिंदू असा करु लागले. परिणामी सिंधू नदीच्या पलिकडच्या लोकांना हिंदू हा शब्द रुढ झाला. म्हणजेच १३ व्या शतकात हिंदू हा शब्द प्रचलित होऊ लागला. त्याआधी हिंदू हा शब्द अस्तित्वात नव्हता.
आजच्या घडीला हिंदू शब्दाचा वापर मुख्यतः वैदिक वंशाचे लोक (ब्राह्मण) व मुस्लिम अधिक करताना दिसतात.
आताचे ब्राह्मण सोडून सिंधू नदीच्या पलिकडे रहाणारे आताचे सर्वच भारतीय सिंधू संस्कृतीचे वारस आणि पर्यायाने मुळचे बौध्द संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत, हे विसरता येणार नाही●
——————————————–
मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम