बौद्ध धम्म प्रसारासाठी डॉ चंद्रबोधी पाटील यांना शतायुषी जीवन लाभावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भगवान बुद्धांनी विश्वाला अहिंसा सत्य आणि समतेचे अमृत तत्व दिले
मुंबई दि.17 – भगवान गौतम बुद्धांनी मानव कल्याणसाठी विश्वाला सत्य ; अहिंसा आणि समतेच्या तत्वांचे अमृत दिले आहे. बौद्ध धम्माची आम्हाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. बौद्ध धम्म चळवळीला वाहून घेतलेल्या डॉ.चंद्रबोधी पाटील यांना धम्म प्रसारासाठी शतायुषी जीवन लाभावे आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ चंद्रबोधी पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. नागपूर येथील दीक्षाभूमी ऑटोरियम सभागृहात आयोजित डॉ.चंद्रबोधी पाटील अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर पूज्य भदंत नागदिपंकर महाथेरो; भदंत नागसेन; पी आर पी चे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे; रिपाइं चे राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर; रिपाइं चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वेंकट स्वामी; दि बुद्धिस्ट सोसायटी चे ट्रस्टी धम्मरतन सोमकुंवर; सत्कार समिती चे संयोजक शंकरराव ढेंगरे; राजन वाघमारे; मनोहर दुपारे; प्रा सविता कांबळे; घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ चंद्रबोधी पाटील यांनी भोपाळ ;नागपूर सह देशभर धम्म चळवळीचे काम केले आहे. बौद्ध उपासकांना संघटित केले आहे.भोपाळ मध्ये करुणा बुद्धविहार एक आदर्श बुद्ध विहार उभे केले आहे.चंद्रबोधी पाटील यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्याशी माझे भारतीय दलित पँथर पासून मैत्रीसबंध आहेत. त्यांनी दलित पँथर पासून माझे नेतृत्व वाढविण्यासाठी योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वार विश्वास ठेऊन काम केले आहे.त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा होताना त्यांनी वयाची शंभरी गाठावी आणि वयाचे नाबाद शतक साजरे करावे. त्यांनी आयुष्यभर बौद्ध धम्म चळवळीला वाहून घेतले आहे .यापुढे ही बुद्ध धम्म चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य आणि आयुष्य लाभो अशी सदिच्छा यावेळी ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.