बोरडा शिवारीतील बीएसएनएल टावर च्या २४ बॅटरी चोरी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बोरडा शिवार येथे अमृते यांच्या शेतात लावलेले बीएसएनएल टावर च्या खाली असलेल्या काॅबिनेट चा अज्ञात आरो पीने दरवाजा तोडुन अमर राजा कंपनीचे २४ बॅटरी किंमत १, ०८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त माहिती नुसार मौजा बोर्डा शिवार येथे (दि २) जुन २०२१ चे ११ वाजता ते (दि.८) जुन २०२१ चे २ वाजता च्या सुमारास फिर्यादी नामे सुशील कुमार लक्ष्मीप्रसाद पटेल वय ४२ वर्ष रा.प्लाॅट नं. २२० गणेश नगर नागपुर हा बीएसएनएल कंपनी मध्ये इलेक्ट्रीशि यनचे काम पाहत असुन साईड डाऊन झाल्या मुळे अमृते यांच्या शेतात लावलेले बीएसएनएल टावर चेक केले असता टावरच्या खाली असलेल्या काॅबिनेट चा अज्ञात आरोपीने राॅडनी दरवाजा तोडुन त्यामध्ये अस लेले अमर राजा कंपनीचे एकुण २४ बॅटरी किंमत १, ०८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. सदर प्रकर णी फिर्यादी सुशील कुमार लक्ष्मीप्रसाद पटेल यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कन्हान येथे अज्ञात आरो पी विरुद्ध कलम ३७९ भादंवि कायदान्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात नापोशि प्रविण चव्हान हे करीत आहे.