क्राइम न्यूज़ महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

Summary

मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे धडक मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान अवैधरित्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक […]

मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे धडक मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान अवैधरित्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत व अवैध अॅग्रीगेटरविरुध्द फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुंबई महानगरात अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. ही प्रवासी वाहतूक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करुन शासनाची व प्रवाशांची फसवणूक करुन राजरोसपणे सुरु असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार मोटार व्हेईकल अॅग्रीग्रेटर पॉलिसीनुसार अॅप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना सध्या या कंपन्यांकडून अशा कुठल्याही तरतुदींचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे आढळले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *