महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बृहन्मुंबई हद्दीत १७ ऑक्टोबरपर्यंत एअर मिसाईल, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

Summary

मुंबई, दि. 11 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट,  ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई हद्दीत 17 ऑक्टोबर पर्यंत बंदी लागू करण्यात आली असल्याची […]

मुंबई, दि. 11 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट,  ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई हद्दीत 17 ऑक्टोबर पर्यंत बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरिता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *