BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बृहन्मुंबई परिसरात १५ जुलैपर्यंत १४४ कलम लागू

Summary

मुंबई, दि. 02 : कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई परिसरात दि. 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. फौजदारी […]

मुंबई, दि. 02 : कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई परिसरात दि. 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *