बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
Summary
बुलढाण्यात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत शिवसेनेला धमकीवजा इशारा दिलाय. पाहूयात काय म्हणालेत आमदार संजय गायकवाड ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत […]

बुलढाण्यात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत शिवसेनेला धमकीवजा इशारा दिलाय. पाहूयात काय म्हणालेत आमदार संजय गायकवाड
ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर ” चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिलीय..” (Buldhana Sanjay Gaikwad) तर कालच्या राड्यात कमी झाले कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल” असा इशारा ही गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
यालाच प्रति उत्तर म्हणून
शिवसेना नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी आव्हान दिले आहे
यापुढे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ने तोंड सांभाळून वापरावे नाहीतर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू