बुरशी जन्य आजार.. म्युकरोमायसीस. ..प्रत्येकानेच बुरशीला बघितले आहे.. बुरशी नेमकी कुठे येते? कशी असते? ती येण्याचे कारण काय आहे? ती येऊ नये यासाठी काय केले पाहिजे? सुनील जाधव यांनी दिली जनहितार्थ माहिती.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 23 मे 2021:-
ओलसर आणि दमट वातावरण असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थांवरती बुरशीची .. अत्यंत वेगाने वाढ होते.
म्हणजेच….ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही आणि हवेचा वावर मुक्तपणे होण्यास अडथळा असतो.. अशा ठिकाणीच बुरशी झटपट वाढते..याचा अर्थ असा आहे का की जिथे सूर्यप्रकाश आणि खेळणार वारं नसतं त्याठिकाणी बुरशी येतच नाही…
ज्या ठिकाणी मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असते त्याठिकाणी बुरशीला वाढण्यास फार कमी वाव असतो..
उदाहरणार्थ.
गरम चपात्या केल्यावर…
त्यातली एक चपाती गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात घालून ठेवून दिली …आणि एक चपाती उघड्यावरच… जिथे खेळती हवा भरपूर सुर्य प्रकाश पोहोचतोय अशा ठिकाणी ठेवली ..तीन दिवसानंतर दोन्ही पोळ्यांचे निरीक्षण केले तर..
हवाबंद डब्यातील चपाती बुरशीने व्यापलेली सापडेल …तर त्याउलट उघड्यावर ठेवलेली चपाती वाळून कडक झालेली असेल.. त्यावर धूळ जमा झालेली दिसेल..पण बुरशी नसेल…
गृहिणींना हा अनुभव बरेचदा मिळतो…असं का झालं असेल? मित्रांनो.. तर या मागे आहे विज्ञान… खेळती हवा आणि सूर्यप्रकाशामुळे बुरशीची .. वाढ होण्यास अटकाव होतो..
*म्युकरोमायसिस* अर्थात काळी बुरशीच्या आजार
बरोबर.. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या काही लोकांना हा आजार आपल्या कवेत घेतो आणि.. खूप मोठ्या काळजीत टाकतो…
तुम्हाला प्रश्न पडला असेल चपाती वर येणाऱ्या बुरशीचा आणि आपल्याला होणाऱ्या या आजाराचा काय संबंध..?
तर मग तुम्हाला बरोबर प्रश्न पडलेला आहे याबद्दल खात्री बाळगा..
बुरशीचा आजार ओलसर आणि दमट ठिकाणी बंद ठिकाणी चटकन निर्माण होतो, पसरतो .. वाढतो..ज्या ठिकाणी मुक्त खेळती हवा नाही.. सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बुरशीची वाढ झटपट होते..जर तुम्ही बातम्या बारकाईने वाचल्या ऐकल्या ..तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल.. लोकांना बुरशीचा संसर्ग नाकातील पोकळीमध्ये, घशात.. झालेला असतो ज्यामुळे अनेकांचे डोळे खराब होतात टाळूला छिद्र पडते इत्यादी…. इत्यादी… इत्यादी..
*कारण काय?*
तर तुमची इम्युनिटी खूप कमी झालेली आहे… कशामुळे?
कोरोना वरच्या औषध उपचारा मुळे.?.बरोबर आहे..परंतू …या शिवाय बरेच कारणेही अत्यंत महत्त्वाची आहेत..मास्क नियमित पणे न बदलने . दिवसातील चोवीस तास मास्क तोंडावर बांधून ठेवल्यामुळे सूर्यप्रकाशात न बसल्यामुळे…. नाकाच्या मार्गाची, घशाची नियमितपणे स्वच्छता न केल्यामुळे.. बुरशीला वाढ होण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण मिळते..
आणि मग असा इम्युनिटी कमी व्यक्ती या आजाराला सहज बळी पडतो… मग करायला काय हवं?
करोना वर औषध उपचार तर करणं गरजेचं आहे ना….. नक्कीच करोणा चा औषध उपचार घेतलाच पाहिजे..
परंतु जरा नियमही पाळा आपण वापरत असलेले मास्क वेळच्या वेळी स्वच्छ करा ..
जर तुम्ही एकांतात असाल तर मास्क घालून न बसता मोकळी हवा येईल ..खूप सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बसा.. सर्दीने नाक चोंदलेले असते ते वेळच्या वेळेस स्वच्छ करा…
गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा आणि तोंड निर्जंतुक करत राहा..
*जलनेती*. .. जाणकार. व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली जलनेती करून आपल्या नासिका मार्गाची अत्यंत कुशलता पूर्वक सफाई करा. सगळ्याच गोष्टींना डॉक्टरांना जबाबदार धरणे सोडून द्या. औषधोपचारमुळे तुमची इम्युनिटी कमी झाली आहे म्हणून औषधोपचारानवरतीही घसरू नका..लक्षात ठेवा आपली जबाबदारी आपणच उचलायला हवी. आत्ता सांगितलेल्या चार गोष्टींचे जर पालन केलात… तर काळी बुरशी नावाचा आजार तुमच्या जवळ पास ही फटकणार नाही..
जर तुमचे आप्तेष्ट, नातेवाईक ..ज्यांना करोना झालेला आहे…. किंवा जे त्या आजारातून बाहेर पडत आहेत…. त्यांना सगळ्यांना या गोष्टी कंपल्सरी पाळायला लावा…
आपले जिवलग आपल्याजवळ राहावेत असे वाटत असेल तर… त्यांची काळजी घेणे… त्यांना स्वतःला त्यांची काळजी घ्यायला लावणे… ही आपली जबाबदारी आहे. रुग्ण कितीही आळस करत असेल. कंटाळा करत असेल…
त्याला त्या गोष्टीची शिसारी असेल चीड असेल तरीही त्याला प्रयत्नपूर्वक, प्रेमाने ह्या गोष्टी करायला लावणे गरजेचे आहे. बाकी आपली मर्जी ? पैशाचा माज जीव वाचवण्यासाठी नेहमीच उपयोगी पडत नाही. तसेच डॉक्टरही औषध उपलब्ध नसले तर तुम्हाला इच्छा असूनही काडीचीही मदत करू शकत नाही. ही गोष्ट गांभीर्याने समजून घ्या..आणि म्हणूनच नैसर्गिकरित्या …पथ्यपाणी, नियमित स्वच्छता, सूर्यप्रकाश .. आणि आवश्यक व्यायाम.. याचा वापर करून स्वतःला तंदुरुस्त ठेवा ..
*कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो…*
त्यामुळे मास्क चा अतिरेकही टाळायला शिका…
जर तुम्ही गर्दीसोबत नाहीत, इतरांच्या सोबत नाही आहात, मोकळ्या वातावरणात किंवा आपल्याच घरी एकांतात असाल… तर मास्क ला शंभर टक्के बाजूला ठेवा आणि मोकळा श्वास घ्या….
या सगळ्या गोष्टी तुम्हाला बुरशीजन्य आजारापासून दूर ठेवतील.. आणि मोकळा श्वास घेतला तर तुमची ऑक्सिजन लेवलही खूप झटपट वाढेल.