बुध्दाची मैत्री व करुणेचा संदेश मानवाला शक्ती प्रदान करतो
डाॅ.भास्कर कांबळे
बल्लारपुर – आज देशात सत्ताप्राप्तीसाठी समाजाच्या संघटन शक्तीला मजबूत करण्यासाठी समाजात काल्पनिक शत्रू निर्माण केल्या जात आहे. समाजाला भ्रमित केल्या जात आहे की शत्रू तुमच्या
आसपास आहे म्हणून संघटीत रहा असा नारा देवून समाजात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. परंतू बुध्दाच्या मैत्री,प्रेम आणि करुणेच्या मार्गावर चालून समाज संघटित करुन शक्ती प्राप्त केल्या जाऊ
शकते.तथागत बुध्दाच्या २५६८ व्या जयंती निमित्त शारिरिक शिक्षण महाविद्यालय, सभागृह विसापुर येथे समता सैनिक दल,विसापुर,तालुका बल्लारपुर
तर्फें समारोपिय कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल
भास्कर कांबळे सर यांनी वरील
भाष्य केले.
ते पुढे म्हणाले,” समाज जर बुध्द विचाराने चालेल तर तो आपली प्रगती करु शकतो.व मैत्री प्रेम आणि करुणा या तत्वाने शक्तीशाली बनू शकतो. बुध्द जयंती निमित्य १९ मे तें २२ में या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची समाप्ती
बुध्द जयंती २३मे,२०२४ ला एक कार्यक्रम घेऊन करण्यात आली.
यावेळी समता सैनिक दलाचे पथसंचलन धम्मभूमी ते डा.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यंत करण्यात करण्यात आले.याप्रसंगी अभीवादन व शपथग्रहण झाले. समारोपिय कार्यक्रमात मार्शल धनराज पुणेकर,चंद्रपुर जिल्हा संघटक,मार्शल उज्वला खोब्रागडे,चंद्रपुर जिल्हा संघटिका,महिला विंग ,मार्शल अमर आक्केवार,जिल्हा ट्रेनिंग आफिसर,मार्शल कृष्णमुर्ती रामटेके,तालुका बौध्दिक प्रमुख,मार्शल श्रध्दा अलोणे,बल्लारपुर तालुका संघटिका महिला विंग,
मार्शल मोहन देठे,प्रवक्ता बल्लारपुर तालुका,मार्शल पियुष कासोटे,ट्रेनिंग आफिसर,मार्शल कशिश अलोणे वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मार्शल वैभव मेश्राम व आभार परमेश्वर उमरे यांनी मानले.