बीन परवाना रेती सह वाहन पोलीसांचे ताब्यात वाहनासह ४३टन रेती पोलीसांचे ताब्यात तहसीलदारा कडे अहवाल पाठविला
कोंढाळी-
२७नव्हेंबर चे सकाळी १०-३०चे दरम्यान कोंढाळी पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार राजिक शेख व शिपाई गोविंद मैंद हे कामगीरीवर असतांना कोंढाळी -काटोल मार्गावरील कलकुही शिवारात भंडारायेथून रेती भरून काटोल कडे जात होता. गस्तीवर असलेल्या पोलीसांनी एम एच -३१-एफ सी४००० मालवाहू ट्रक तपासणी दरम्यान वाहनात रेती भरून असल्याचे आढळून आले. वाहनातील रेती ची वाहतुक परवाना गौण खनिज उत्खनन परवाना ची मागणी केली असता. वाहन चालकाकडे रायलटी आढळून आली नाही. रेती भरलेल्या वाहनांची तपासणी दरम्यान काटोल चे तहसीलदार राजू रणवीर ही कोंढाळी वरुन काटोल कडे जात असताना त्यांनी ही रेती भरलेल्या वाहनाची तपासणी बाबद पोलीसांकडे विचारणा केली असता संबंधित वाहन चालकाडे रारलटी नसल्याचे समजताच संबधीत प्रकरणी वाहन कोंढाळी पोलीस स्टेशन येथे जमा करून कोंढाळी मंडळ राजस्व निरिक्षक सुरज साददकर तसेच महसुल सहायक राजेंद्र सरोदे यांनी वाहना चे वजन करुन सदर माहिती त्याचा अहवाल तहसीलदार राजू रणवीर यांना सादर केला.
वहनासह ४३टन रेती भरलेल्या वाहन चालक खुशाल केवलराम बडगे (३४)रा काटोल नाका नागपूर सह रेती भरून असलेला ट्रक ताब्यात घेऊन पुढिल तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी , पी एस आय धवल देशमुख, हेडकॉन्स्टेबल शेख राजीक, शिपाई गोविंद मैंद तपास करित आहे.