BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

बिनापरवाना रेती वाहतुकीवर भंडारा पोलिसांची धडक कारवाई ६ ब्रास रेतीसह ट्रक जप्त; चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Summary

भंडारा : जिल्ह्यात अवैध रेती चोरी व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, भंडारा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. बिनापरवाना रेती वाहतूक करत असताना एका ट्रकसह तब्बल सहा ब्रास रेती जप्त […]

भंडारा :
जिल्ह्यात अवैध रेती चोरी व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, भंडारा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. बिनापरवाना रेती वाहतूक करत असताना एका ट्रकसह तब्बल सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली असून ट्रक चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण असे की, तहसील कार्यालय भंडारातर्फे अधिकृत ग्राम महसूल अधिकारी उर्वशी विनोदकुमार शिंगुमारे (वय २८) यांनी दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान मौजा भंडारा, अंदाजे ३ किमी उत्तर भागात वाहन तपासणी सुरू असताना ट्रक क्रमांक MH 40 BH 2172 थांबवला. तपासणीदरम्यान सदर ट्रकच्या डंपरमध्ये कोणताही वैध पास अथवा परवाना नसताना ६ ब्रास रेती (किंमत सुमारे ₹२४,६००) अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी ट्रक चालक व मालक म्हणून अमित संजय गायधने (वय ३५, रा. रोहा, ता. मोहाडी, जि. भंडारा) यास विचारणा केली असता, सदर ट्रकचा चालक व मालक मीच असल्याची कबुली त्याने दिली. शासनाच्या महसुलाचे नुकसान करत, पर्यावरणाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रेतीची बिनापरवाना वाहतूक केल्याचे स्पष्ट झाल्याने महसूल अधिकाऱ्यांच्या तोंडी तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अप.क्र. १५१/२०२६, कलम ३०५(म) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात रेती चोरीविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *