बिडी उत्पादनावरील छत्रपती संभाजी महाराज यांचे नावं हटवा.
संभाजी महाराज यांच्या जन्मभूमीत आमरण उपोषणाला पाठिंबा
शिवधर्म फाऊंडेशन चंद्रपूर यांचे एक दिवशीय उपोषण व विरोध प्रदर्शन
महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून शिवाजी बिडीचं उत्पादन होत आहे. या शिवाजी बिडीचे नावं बदलण्यासाठी 1975साली आंदोलन झाले. त्यावेळी या बिडीचे नावं बदलून संभाजी बिडी ठेवण्यात आले. संभाजी महाराज यांचे देखील नावं संभाजी बिडीला देऊ नये या मागणी साठी आज संभाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला शिवधर्म फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे याला चंद्रपूर जिल्ह्यातून समर्थन.
शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडी ला दिलेले नावं हटवण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आंदोलन आज पासून सुरु झाले आहेत….
संभाजी महाराज यांचे नावं बिडी वरून हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे शिवधर्म फाउंडेशन(चंद्रपूर जिल्हा) च्या अध्यक्षा मेघा ढमढेरे,किनारा खोब्रागडे,पूजा निकोडे, मयुरी आत्राम, शफक शेख,आकाश बागडे संजय केंद्रे,अंकिता,पंकज कोराडे,प्रतीक काकडे, आदित्य यांनी एकदिवसीय उपोषण सुरु केले आहे व छ.संभाजी बिडी विरूद्ध नारे देऊन विरोध प्रदर्शन केले….
संभाजी बिडी हे नावं बदलले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
ही मागणी करण्यात आली.