महाराष्ट्र हेडलाइन

बार्टी समतादुत तर्फे केसरीमल पालीवाल विद्यालयात पारशिवनी येथे वृक्षरोपन

Summary

नागपूर पारशिवनी – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथे वृक्षरोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाची स्वायंता संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे […]

नागपूर पारशिवनी – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथे वृक्षरोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची स्वायंता संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पाच्या अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात पर्या वरण दिनानिमित्य दि.५ जुन ते २० जुन या पंधरवाड यात वृक्षरोपण कार्यक्रम अभियान राबविण्यात येत आहे. या अनुसंगाने केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी ला समतादुत शुभांगी टिंगणे हयानी विद्यालयाच्या प्राचार्य सौ पी व्ही कोलते मॅडम यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग असुन वृक्ष केवळ आपले जिवन प्रभावित करतात असे नव्हे तर ते आपले अस्तिव सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात असे मौलिक विचार कोलते मॅडम नी व्यकत केले. याप्रसंगी लोणारे सर, खवले सर , मेश्राम सर, ढोबळे सर, पझई सर, पालीवाल मॅडम सह शिक्षक गण व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *