बारव्हा/पेठ बाजारातील सट्टा पट्टी बंद करा _अन्यथा तीव्र आंदोलना चा गावकऱ्यांनी दिला इशारा_
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बारव्हाः ह्या गावातील सट्टा पट्टी बंद करा अश्या मागणीचे निवेदन दि.22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ ज्योतीताई ब्राह्मणकर समिती व पदाधिकारी सदस्या तसेच ग्रामस्थ यांनी भंडारा मा.जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब मतांनी लोहित यांना दिले आहे . बारव्हा बाजार पेठ परिसरातील सदैव दरवळीचा मार्ग आहे दहा ,वीस गावातील बाजारा करीता येतात आणि विद्यार्थी या मार्गाने ये – जा करतात त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये सट्टा पट्टी चे अवगुण होत आहे विद्यार्थ्याच्या तोंडातून सट्टा पट्टीचे भाष्य बोल्ले जाते येणारी पिढी वाम मार्गाकडे जात आहे.ग्रामीण बँक .को आप्रेटिव बँक स्टेट बँक दोन कालेज या मार्गाने येणाऱ्या -जाणारा लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बारव्हा पेठ बाजारातील सट्टापट्टी बंद व सट्टा पट्टी खैवाल विजय लाबकाने यांना रंगेहात पकडून कारवाई करा असा पावित्र्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना सौ ज्योतीताई ब्राह्मणकर जिल्हा उपाध्यक्ष भंडारा समिती पदाधिकारी व ग्रामस्थांनी उभारला आहे . भविष्यात शाळेतील विद्यार्थी सुरळीत वाव करेल असे निवेदन सादर करताना निवेदनावर सह्या करणारे कार्यकर्ते कुसुंमबाई सोनवणे संगीताताई शेंद्रे राजश्रीताई सोनवणे करिष्माताई मेश्राम वैशालीताई येरने ,शेखर नैताम मंगेश लाडे दिलीप शेंडे रेवाचन शेंद्रे केशव कांबळे जगेस्वर झोडे अमोल नगोसे मुन्ना बुद्ध गावकरी प्रमाणात होते.