बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम, 12 तास अभ्यास, विकासाचा ध्यास
Summary
क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, उर्जानगर वसाहत यांचे विद्यमानेऊर्जानगर वसाहतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. पण महामानवाला मनापासून नमन करायचे असेल तर जयंतीच्या मंगलमय पर्वावर एक कृती करण्याचे आवाहन […]

क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, उर्जानगर वसाहत यांचे विद्यमानेऊर्जानगर वसाहतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. पण महामानवाला मनापासून नमन करायचे असेल तर जयंतीच्या मंगलमय पर्वावर एक कृती करण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीनी केले आहे.आज दिनांक 13/04/2025 रोजी सकाळी 6:00ते सायंकाळी 6:00 पर्यँत स्नेहबंध सभागृह, उर्जानगर वसाहत, चंद्रपूर येथे 12 तास अभ्यास, उपक्रम व मानवंदनाचे आयोजन केले होते.
14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस, सरकारी सुट्टी असते. हा दिवस सर्व देशभर आणि जगात सुद्धा साजरा केला जातो. यादिवशी, बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचे जीवन व कार्याची उजळणी केली जाते. संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान मूल्यांवर चर्चा होते. असे करणे आवश्यकही आहे. संविधानाचे विचारमुल्ये सर्वत्र पोहचविण्याचा हा एक उत्तम दिवस आहे. समाजात हा दिवस मनोभावे साजरा होतो. परंतु सर्वच समाजात होत नाही. बाबासाहेबांच्या संविधानामुळे ज्यांना ज्यांना संधी मिळाली, अधिकार मिळाला त्या सर्वांनी ,विशेषतः महिलांनी हा दिवस साजरा केला पाहिजे. बाबासाहेबांची प्रतिमा घरोघरी लावली पाहिजे. महामानव कोणत्या एका समाजाचे नसतात, सगळ्यांचे असतात. तेव्हा सगळ्यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे. जातीयतेतून महामानवाकडे पाहणे बरोबर नाही.मागील काही वर्षापासून जमेल तेवढे नाविन्यपूर्ण उपक्रम सिएसटिपिएस येथील जयंती उत्सव समिती राबवित आहे.त्यातील एक उपक्रम म्हणजे ,13 एप्रिलला जयंती निमित्त राबविलेला, 12 तास अभ्यास:विकासाचा ध्यास: हा उपक्रम आहे. सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6वाजेपर्यंत सतत चाललेल्या 12 तास, या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाट्क
शाम राठोड, उपमुख्य अभियंता
कार्यक्रमाचे अध्यक्ष
डॉ. संगीता बोदलकर
वैद्यकीय अधीक्षक,
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. अशोक उमरे साहेब,
उपमुख्य अभियंता (प्र)
तसेच समितीचे कार्याध्यक्ष आयु. निलेश भोंगाडे
सचिव आयु. मंदार वंजारी
कोषाध्यक्ष आयु. मनिष पाटील
सहकोषाध्यक्ष आयु. शर्मिला मुनघाटे
उपाध्यक्ष आयु. हेमंत पवार
सहसचिव आयु. सुनिल काटकर
अंतर्गत तपासणीस आयु. मंगेश केदार
महिला संघटक आयु. ज्युही घरडे आणि जयंती उत्सव समितीचे समस्त पदाधिकारी व उर्जानगर रहिवासी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला