BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे चंद्रपूर महा औष्णिक केंद्र चे मुख्य अभियंता यांना निवेदन

Summary

चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र मधील रोटे करण्यात यावे. ESP U 5 & 6 मधील दोन रोटे बंद केलेत ते पूर्ववत सुरु करण्यात यावेत. ऑपरेशन मधील कोणतेही स्पॉट unman ठेवण्यात येऊ नये. ज्या कसर्मचाऱ्यांना overtime मिळतो त्यांना c/off देण्यात येऊ […]

चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र मधील रोटे करण्यात यावे.
ESP U 5 & 6 मधील दोन रोटे बंद केलेत ते पूर्ववत सुरु करण्यात यावेत.
ऑपरेशन मधील कोणतेही स्पॉट unman ठेवण्यात येऊ नये.
ज्या कसर्मचाऱ्यांना overtime मिळतो त्यांना c/off देण्यात येऊ नये.
कर्मचाऱ्यांना वेळेवर G.O. लावण्यात यावे.
महाजनको च्या नियमाप्रमाणे अभियंता व कर्मचारी यांची विभाग बदली करण्यात यावी. जेणेकरून दुसऱ्या विभागातील कामे शिकता येईल.
टेरेस लिकेज ची कामे वेळेवर होत नाही ती वेळेवर पूर्ण करण्यात यावी.
रिनोवेट झालेली नाही अश्या F टाईप गाळ्यामध्ये गिझर लावण्यात यावे.
ऊर्जानगर वसाहत मधील रिंगरोड तसेच आतील रोड खूपच खराब आहे. ते दुरुस्त करण्यात यावे. मागील मिटिंग मध्ये हा मुद्दा आलेला होता.
ऊर्जानगर सौदामिनी चौक ते ऊर्जाभवन रोडवरील झाडाची फांदे तोडण्यात यावी व तसेच रिंग रोडवर वरील झाडाच्या फ़ांद्या तोडण्यात यावे.
गाळे वाटपाची नियमावली बनविताना संघटनेला सर्व संघटनेला विश्वासात घेऊन तयार करावी.
प्रमोशन पॅनल लवकरात लवकर घेण्यात यावे.
जे कर्मचारी माहे जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होतात त्यांना 75 तास ओव्हर टाइम देण्यात यावा.
तेरेस ची साफसफाई वेळेवर करण्यात यावी.
Unit 5,6,7 बॉयलर MCC board मध्ये Air Washer सुरु करण्यात यावे.
दुपारी 12 ते 12:30 व सायंकाळी 05:30 ते 06:00 वाजेपर्यंत प्लॉट मधील ट्रक वाहतूक बंद ठेवण्यात यावे.
युनिट 5,6,7 मधील मधमाशाचे पोळ लवकरात लवकर काढण्यात यावे.
निम्मस्तर लिपिक यांना उच्चस्तर लिपिक या पदावर पदोन्नती करण्यात यावी व याकरिता निवड समिती गठीत करण्यात यावी.
(मानव संसाधन विभाग) व (वित्त व लेखा विभाग)
G.O. 74 ची प्रकरणे निकाली काढण्यात यावी.
C.S. 28 अनुकंपा अंतर्गत प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे.
प्रकल्पग्रस्त उमेदवाराची प्रकरणे मुख्य कार्यालय मुंबई यांच्याशी योग्य पाठपुरावा करून निकाली काढण्यात यावी.
ऊर्जाभवन येथील वित्त व लेखा विभाग कार्यालयाचे नूतनिकरण लवकरात लवकर करण्यात यावे.
मानधन तत्वावर कार्यरत निम्मस्तर लिपिक (वित्त व लेखा विभाग) व (मानव संसाधन विभाग) कर्मचाऱ्याची 2020 ला रुजू (protection period) पूर्ण झाल्याचा अहवाल मुख्य कार्यालय मुंबई येथे सादर करण्यात यावा.
Meddy assist कंपनी अंतर्गत वैद्यकीय समन्वय उपचारावेळी योग्य मार्गदर्शन व त्याचा अभाव निदर्शनास येत आहेत याबाबत संघटनेला बरेचसे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
चंद्रपूर महा औष्णिक केंद्रात कार्यरत कर्मचारी व अधिकारी गंभीर आजाराने ग्रस्त व वैद्यकीय कारणास्तव अंतर्गत विभाग बदली देण्यात यावी.
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद व इतर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूका जाहीर झाल्यास.
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर प्रतिनियुक्ती करतेवेळी त्याची वयोमर्यादा व शारीरिक क्षमता आजारपण किंवा दुर्लभ व्याधीने ग्रस्त आहे यांच्या विचार निवडणूक प्रक्रियेच्या ड्युटीवर सुरू देण्यात ही विनंती.
वरील सर्व जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी करिता श्री. मा. मुख्य अभियंता साहेब यांचे सोबत बैठक लावावी अन्यथा संघटनेला लोकशाही मार्गाने केव्हाही आंदोलनाची घ्यावी लागेल.
याची नोंद घ्यावी ही विनंती.
अश्या मागण्या मा. श्री. राजेश नामदेव आत्राम, शाखा सहासचिव, बहुजन पॉवर कर्मचारी संघटना यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *