बस स्थानकाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरुच राहणार – सलील देशमुख
काटोल,/कोंढाळी- प्रतिनीधी
काटोल, नरखेड, कोंढाळी, मोवाड, जलालखेडा येथील बस स्थानकाच्या विकासासाठी आतापर्यत २३ कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यापैकी अनेक कामाची सुरुवात सुध्दा सुरु झाली आहे. शिवाय काही कामासाठी निधी मंजुर न झाल्याने ती कामे रखडली आहे. त्या कामासाठी निधी मंजुर होण्यासाठी माझा प्रयत्न सुरु असून बस स्थानकाच्या विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
त्यांनी नुकतीच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून सुरु असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला व प्रस्तावित कामासाठी निधी मंजुर करावा यासाठी निवेदन दिले. काटोल येथील बसस्थानक परिसरात मोठया प्रमाणात खडे पडले होते. यामुळे याची दुरुस्ती होण्याची आवश्यकता होती. यासाठी सलील देशमुख यांनी सातत्यपुर्ण पाठपुरवा केल्याने ३ कोटी रुपये मंजुर झाले आणि सध्या येथील सिमेंटीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. त्यांच्याच पुढाकाराने येथे नविन ईल्ट्रीकल बसेस मंजुर झाल्या असून नागपूर ते जलालखेडा त्या सुरु आहे. काटोल येथील चार्जींग स्टेशन मंजुर केले असून त्याचे काम सुध्दा प्रगतीपथावर आहे. मंजुर करण्यात आलेल्या १० बसेस या कमी असल्याने आणखी २५ नविन बसेस मंजुर करण्याची तसेच बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी सि.सि.टि.व्ही. मंजुर करण्याची विनंती सुध्दा सलील देशमुख यांनी निवेदनातुन केली आहे.
नरखेड बस स्थानकासाठी ४ कोटी रुपये मंजुर केले असून त्यांच्या पुर्नबांधणीचे काम सध्या प्रगती पथावर आहे. कोंढाळी बसस्थानकासाठी ४ कोटी रुपये मंजुर केले असून बस स्थानक परिसरातील सिमेंटीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. काटोल नरखेड तालुक्यातील गावोगावी बस सेवा अधिक बळकट करण्याच्या हेतूने सतत प्रयत्न सुरू आहे तसेच जलालखेडा व मोवाड येथील बस स्थानकाच्या परीसर नुतणीकरणासाठी १२ कोटी रुपये मंजुर असून त्याचे काम काही तांत्रीक अडचणीमुळे सुरु होवू शकले नाही. या तांत्रीक अडचणी सुध्दा दुर करण्यासाठी सलील देशमुख यांनी परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
फोटो ओळ – परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देतांना सलील देशमुख.